सुपरस्टार सलमान खानने काही महिन्यांपूर्वी ‘मे हूँ हिरो तेरा’ आणि ‘हॅगओव्हर’ ही दोन गाणी गायली. सध्या बॉलिवूड विश्वात सलमान खान अभिनेता रणदीप हुड्डाच्या आगामी ‘लाल रंग’ या चित्रपटसाठी गाणे गाणार असल्याची चर्चा होती. परंतू सलमान आपल्या सुलतान चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असल्याने तो ‘लाल रंग’ साठी गाणे गाणार नसल्याचे रणदीपने स्पष्ट केले आहे.
सलमानने या चित्रपटात एक गाणे गाण्याचे याआधी कबूल केले होते, पण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असल्याने तो गाणे गाणार नसल्याचे रणदीप हुड्डाने सांगितले.
सलमान सध्या आपल्या आगामी ‘सुलतान’ चित्रपटासाठी व्यस्त आहे. परंतू, पुढील वेळेस आपल्यासोबत सलमान नक्की काम करेल असे आश्वासन त्याने दिल्याचेही रणदीप म्हणाला.
अभिनेता रणदीप हुड्डाचा आगामी ‘लाल रंग’ हा चित्रपट दिग्दर्शक सय्यद अहमद अफजल यांनी दिग्दर्शीत केला आहे