News Flash

‘टायगर ३’ सिनेमासाठी सलमान खान गाळतोय घाम; वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क

सलमान खानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून सलमानच्या चाहत्यांकडू व्हिडीओला पसंती मिळतेय.

(Photo-instagaram@beingsalmankhan)

बॉलिवूडचा दंबग खान सध्या त्याच्या ‘टायगर-३’ या आगामी सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सलमान ‘टायगर ३’ या सिनेमाच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून या सिनेमासाठी तो मोठी मेहनत घेत आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी सलमान जीममध्ये घाम गाळतोय. नुकताच सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ जीममधील असून सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडीओत तो जीममध्ये वर्कआउट करताना दिसतोय. हा एक मिरर व्हिडीओ आहे. यात सलमानच्या चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी सलमान खान व्यायाम करत असल्याचं लक्षात येतंय. तर व्हिडीओत ‘टायगर जिंदा है’चं म्युझिक आपण ऐकू शकतो. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिलंय, “मला वाटतंय ही व्यक्ती ‘टायगर ३’ साठी ट्रेनिंग घेत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

हे देखील वाचा: अश्लील व्हिडीओत किती कमाई होते माहित्येय? राज कुंद्राचं दिवसाचं उत्पन्न ऐकून व्हाल थक्क!

सलमान खानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून सलमानच्या चाहत्यांकडू व्हिडीओला पसंती मिळतेय. तसचं सलमानच्या या मेहनतीचं चाहते कौतुक करत आहेत.

‘टायगर ३’ या सिनेमात सलमान खानसोबत अभिनेता इमरान हाश्मी देखील झळकणार आहे. सलमान प्रमाणेच इमरानदेखील त्याच्या फिटनेकडे लक्ष देत आहे. पुन्हा एकदा या सिनेमात सलमान खान एजंट अविनाश सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा जोयाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:22 pm

Web Title: salman khan work out video goes viral preparing for tiger 2 film kpw 89
Next Stories
1 लग्नानंतर पहिल्यांदाच मिताली- सिद्धार्थ एकत्र, ‘या’ सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टी सुद्धा…? पोलिसांनी दिलं हे उत्तर
3 मी ते अ‍ॅप बघितलं होतं; मिका सिंगचा राज कुंद्राला पाठिंबा
Just Now!
X