11 December 2017

News Flash

‘गोलमाल अगेन’मध्ये ‘बिइंग ह्युमन’

एक महिन्यापूर्वीच 'गोलमाल अगेन' च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली.

मुंबई | Updated: October 5, 2017 5:47 PM

गोलमाल अगेन

‘गोलमाल अगेन’ या आगामी बॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ सिरीज धमाक्यातील हा एक नवाकोरा ‘फटाका’ असून, या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचपासूनच ‘गोलमाल अगेन’ बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.

वाचा : ‘या’ अभिनेत्रीला गाठता येणार का पी.टी. उषा यांचा वेग?

नुकतेच सलमान खानने या चित्रपटातील ‘मेने तुजको देखा’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा फोटो ट्विट करत, चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. यात ‘बिइंग ह्युमन’ ची सायकल वापरण्यात आली असून, हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. दरम्यान, चित्रपटाची संपूर्ण टीम जोरदार प्रसिद्धी करत आहे. गेल्या आठवड्यात सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला. २४ तासांच्या आत २० दशलक्ष प्रेक्षकांनी ट्रेलर पाहण्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावे आहे.
आता या चित्रपटाची वाढती प्रसिद्धी लक्षात घेता ‘गोलमाल अगेन’ने प्रदर्शनापूर्वी आणखीन एक विक्रम केला आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगला एक महिन्यापूर्वीच सुरुवात करण्यात आली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी पेटीएमशी भागीदारी केली आहे. अश्याप्रकारे प्रदर्शनाच्या एक महिन्यापूर्वीच होत असलेल्या तिकीट बुकिंगची ही पहिलीच वेळ असल्यामुळे भारतीय चित्रपट इतिहासात ‘गोलमाल अगेन’ची नोंद करण्यात आली आहे.

एक महिन्यापूर्वीच ‘गोलमाल अगेन’ च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर हास्याची आतषबाजी करण्यास येत असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरातील सिनेरसिकांचा चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय.

वाचा : ‘अॅडल्ट स्टार’सोबत दिसला मिथुन चक्रवर्तीचा मुलगा

तिकीट बुकिंगबद्दल, रिलायन्स एण्टरटेन्मेन्टचे एसआयओ शिबाशश सरकार म्हणाले की, ‘चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आम्ही फ्रँचायझीमार्फत येत्या दिवाळीत ‘गोलमाल अगेन’ चा हास्यस्फोट चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रेक्षकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे, पेटीएमने आमच्यासोबत सहयोग केला असून, त्यांच्या सहकार्याने प्रथमच आम्ही चित्रपट प्रदर्शनाच्या चार आठवड्यांपूर्वीच तिकीट बुकिंगला सुरुवात करण्यास तयार झालो.’

First Published on October 5, 2017 5:45 pm

Web Title: salman khans being human cycle in ajay devgan golmaal again