‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक आहे. या शोचे १४ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. खरं तर या शोचा ग्रँड प्रिमियर येत्या २७ सप्टेंबरलाच होणार होता. परंतु मुंबईतील मुसळधार पावसामुळे ‘बिग बॉस’चे तीनतेरा वाजले आहेत. परिणामी चाहत्यांना १४ वं पर्व पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

अवश्य पाहा – बदला घ्यायला येतेय नवी ‘नागिन’; एकता कपूरने शेअर केले अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

गेल्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार या पावसामुळे ‘बिग बॉस’च्या सेटवर पाणी साचलं. त्यामुळे सेट खराब झाला. शिवाय पाऊस सुरु असल्यामुळे सेट काढताही येत नाही. त्यामुळे आता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा नवा सेट तयार केला जाईल. त्यानंतर ‘बिग बॉस’चं शूट सुरु होईल. या प्रक्रियेला किमान आणखी एक महिना लागेल असं क्रिएटिव्ह टीमने सांगितलं आहे. परिणामी ‘बिग बॉस’ चाहत्यांना १४ वं पर्व पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

अवश्य पाहा – सासू-सुनेच्या भांडणावर रॅप साँग; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनमध्ये अनेक नवे बदल पाहायला मिळतील. शिवाय हा सीझन लॉकडाऊन थीमवर आधारित आहे असं म्हटलं जात आहे. यंदाच्या संपूर्ण थीमचं डिझाईन दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी केलं आहे. यावेळी शोमध्ये ग्रीन आणि रेड झोन देखील पाहायला मिळतील असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे या सीझनमध्ये नेमके कोणते कलाकार झळकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.