News Flash

‘ मेंटल‘फेम सना खानला अटकपूर्व जामीन मंजूर

सलमान खानची मेंटल चित्रपटातील सहअभिनेत्री सना खान हिला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तिच्यावर १५वर्षीय मुलीच्या अपहरणात सहभागी असल्याचा आरोप आहे.

| June 19, 2013 08:22 am

सलमान खानची मेंटल चित्रपटातील सहअभिनेत्री सना खान हिला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तिच्यावर १५वर्षीय मुलीच्या अपहरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. मॉडलिंगमधून अभिनयाकडे वळलेल्या २५वर्षीय सना खानने नुकताच बिंग बॉस या रिअॅलिटी गेम शोमध्ये सहभाग घेतला होता. ती काही जाहिरातींमधूनही प्रसिद्धिस आली होती.

सनाचा चुलत भाऊ नावेद याने एका १५ वर्षाच्या अल्पलयीन मुलीस लग्नाची मागणी घातली होती, पण त्यास तिने नकार दिला होता. सदर मुलीच्या अपहरणात सहभागी असल्याच्या आरोपावरुन पोलीस सनाचा शोध घेत होते. याप्रकरणी जेव्हा सनाचा भाऊ नावेद याला त्याच्या क्षितीज दुबे आणि विस्मीत आंब्रे या दोन मित्रांसह पोलिसांकडून अटक करण्यात आली होती, तेव्हा सना खान स्वतःचा मोबाईल फोन बंद करुन फरार झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 8:22 am

Web Title: salman khans co star sana khan gets anticipatory bail
Next Stories
1 फ्रेडा पिंटो बनली ‘गर्ल राइजिंग’ अनुबोधपटाचा हिस्सा
2 ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटास पाकिस्तानमध्ये बंदी
3 स्त्रीला कमी लेखल्यास गुन्हा दाखल व्हावा – अतुल कुलकर्णी
Just Now!
X