चित्रपट प्रदर्शित होण्यास एक महिना बाकी असताना सलमानच्या ‘जय हो’च्या पोस्टरने लोकांचे लक्ष्य वेधले आहे. मागील आठवड्यात ट्विटरवरील ५५ लाख चाहत्यांच्या मदतीने तयार झालेले ‘जय हो’ चित्रपटाचे पोस्टर सलमानने प्रसिध्द केले. हे पोस्टर बनविण्यात चाहत्यांनी केलेल्या मदतीसाठी सलमानने त्यांचे आभारही मानले होते. आता पुन्हा सलमानचा डिजीटल पोस्टर ट्विटरच्या ट्रेण्ड लिस्टमध्ये आला आहे.
‘जय हो’च्या पोस्टरसाठी सलमानने मानले चाहत्यांचे आभार
‘पिपल्स मॅन’ म्हणून सलमानचे चित्र असलेल्या या डिजीटल पोस्टरसोबत त्याने, “जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही काही चागंले केले आहे, तर त्यासाठी आभार मानू नका. हा पोस्टर अजून जास्त लोकांपर्यंत पसरवा,” असा संदेश दिला आहे.

 

२४ जानेवारीला ‘जय हो’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.