News Flash

भाईजानला अब्बूजानकडूनच निगेटिव्ह रिव्ह्यू ; सलीम खान म्हणाले, “राधे चित्रपट काही…”

'सलमानचं करिअर संपलंय का?'; सलीम खान म्हणाले...

सलमानच्या राधे चित्रपटाबद्दल त्याचे वडील सलीम खान यांनीच दिला निगेटिव्ह रिव्ह्यू. (Photos: Instagram/arpitakhansharma and SKF)

बॉलिवूडचा भाईजान असलेल्या सलमानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई’’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज झाला. मात्र, कोट्यवधींची कमाई करणाऱ्या सलमान खानला यावेळी फार कमाई करता आली नाही. कमाईत राधे चित्रपट चांगलाच आपटला. दोन वर्षांनंतर आलेल्या ‘राधे’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे चित्रपट फ्लॉप ठरला. सलमानच्या राधे चित्रपटाबद्दल त्याचे वडील सलीम खान यांनीच निगेटिव्ह रिव्ह्यू दिला आहे.

प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक सलीम खान यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत ‘राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई’’ चित्रपटाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. सलमान खानच्या दबंग ३ आणि बजरंगी भाईजान या चित्रपटाबद्दल बोलताना सलीम खान यांनी राधेबद्दल निगेटिव्ह रिव्ह्यू दिला आहे. सलमानच्या अगोदरच्या चित्रपटाशी तुलना करून राधेबद्दल सलीम खान यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

प्रदर्शित होताच ‘राधे’ चित्रपटाने केला नवा विक्रम

त्यावर उत्तर देताना सलीम खान म्हणाले, “यापूर्वीचे जे चित्रपट होते, पूर्णपणे वेगळे होते. ‘दबंग ३’ वेगळी होती. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट चांगला होता आणि पूर्णपणे वेगळा होता. ‘राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई’’ अजिबातच चांगला चित्रपट नाही. पण, चित्रपटाशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पैसा मिळायला हवा, ही जबाबदारी व्यावसायिक चित्रपटांवर असते. कलाकारांसह निर्माता, वितरक यांच्यासह चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाला पैसै मिळायला हवेत. त्यावरच चित्रपट निर्मिती आणि त्या व्यवसायाचं चक्र सुरू असतं. या चित्रपटात गुंतलेले सर्व भागीदार फायद्यात आहेत. पण, राधे चित्रपट इतका काही ग्रेट नाही,” असं सलीम खान म्हणाले.

‘राधे’ तोट्यात…कोटी रुपये जमवतानाही झाली दमछाक

‘सलमानचं करिअर संपलंय का?’; सलीम खान म्हणाले…

सलमान खानचं करिअर संपल्याचं बोललं जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं सलीम खान यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर सलीम खान म्हणाले, “सलमान खानचा अपेक्षित परफॉर्मन्स झाला नाही की, प्रत्येक वेळी ते बोलत असतात. पण, सलमान खानचा हिट चित्रपट आला की, सगळी पु्न्हा त्याचीच चर्चा होते, ही वस्तुस्थिती आहे,” असं सलीम खान म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 6:52 pm

Web Title: salman khans film negative review from salim khan radhe is not a great film negative review from salim khan bmh 90
Next Stories
1 किम कार्दशियन अडकली वादात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
2 ‘मिर्झापूर’च्या बबलू पंडितने अ‍ॅमेझॉन प्राइमकडे केली तक्रार; फॅन्सनी विचारलं, “नेटफ्लिक्सने सांगितलंय का ?”
3 ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीमचा आरोग्यमंत्र, संजनासोबत इशा आणि गौरीचा योगा
Just Now!
X