News Flash

सलमानचा ‘अंतिम’मधला लूक व्हायरल, पाहा व्हिडीओ

आयुष शर्माने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने नुकताच ‘राधेः योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. हा चित्रपट यंदा प्रदर्शित होणार होता पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता सलमानने चित्रपटाचे उर्वरित शूटिंग पूर्ण केले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम जोरात सुरू आहे. सलमानने आता त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचे चित्रीकरणास सुरूवात केली आहे. चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ अभिनेता आयुष शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

आयुष शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, सलमान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या व्हिडीओतून सलमानने ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केल्याच दिसत आहे. व्हिडीओतून सलमानचा फर्स्टलूक दाखवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सलमान एका भाजी बाजारातून जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘अंतिमच्या चित्रीकरणास सुरुवात’ अशा आशयाच कॅप्शन आयुषने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

आणखी वाचा- सलमानचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा? भाईजानच्या ‘या’ फोटोची होतेय सोशल मीडियावर चर्चा

‘अंतिम’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून पुण्यात सुरू झाले होते. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. सलमान खान २-३ दिवसांपूर्वी तिथे पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 1:44 pm

Web Title: salman khans first look from antim the final truth released video viral dcp 98 avb 95
Next Stories
1 रणबीरनेच रणवीरला दिला फर्स्ट ब्रेक; ‘हे’ काम देत संपवला ६ वर्षांचा वनवास
2 ‘या’ हॉलिवूडपटात निक-प्रियांका पहिल्यांदाच एकत्र
3 वरुण धवन, क्रिती सेनॉन पाठोपाठ नीतू कपूरही करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X