30 October 2020

News Flash

सलमाची ‘जय हो’ सहकलाकार डेझी शहावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा?

बॉलीवूडमधली नव-अभिनेत्री आणि 'जय हो'ची स्टारकास्ट डेझी शहा, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि अभिनेता रजनीश डुग्गल यांच्याविरोधात चक्क खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भोजपूरी अभिनेता सत्येंद्र सिंहने पोलीस

| February 13, 2014 12:20 pm

बॉलीवूडमधली नव-अभिनेत्री आणि ‘जय हो’ची स्टारकास्ट डेझी शहा, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि अभिनेता रजनीश डुग्गल यांच्याविरोधात चक्क खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भोजपूरी अभिनेता सत्येंद्र सिंहने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री डेझी शहा, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि अभिनेता रजनीश डुग्गल एका ‘सोडा’ नावाच्या चित्रपटासाठी एकत्र काम करत होते. त्या दरम्यान, माझी माहिती काढून मारण्याचा कट रचल्याचा आरोप सत्येंद्र सिंहने या तिघांविरुद्ध केला आहे. यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आली असून याबद्दल रजनीश डुग्गलला समजले असता त्याने आश्चर्य व्यक्त करत, कोणत्याही सत्येंद्र नावाच्या व्यक्तीला आणि सोडा नावाची कोणताही चित्रपट आतापर्यंत केला नसल्याचे रजनीशन म्हटले आहे. तसेच एफआयआरमध्ये त्याचे नाव दाखल केले असल्याचे समजताच धक्का बसल्याचेही तो म्हणाला.
रजनीश सध्या ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमासाठी केपटाऊनमध्ये गेला आहे. या प्रकरणासंबंधी रजनीशने आपल्या वकिलाला लक्ष घालण्यास सांगितले आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2014 12:20 pm

Web Title: salman khans jai ho co star daisy shah accused of attempt to murder
Next Stories
1 ‘मॅड इन इंडिया’त सिद्धार्थचा मराठी तडका!
2 अजय देवगण ‘बिग बॉस’?
3 सिनेमा प्रेमाचा…
Just Now!
X