18 September 2020

News Flash

सलमाननं ईदसोबतच ख्रिसमससुद्धा केला बुक; ‘किक २’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘मेरे बारे मे इतना मत सोचना दिल मे आता हूँ, दिमाग मे नही’

‘मेरे बारे मे इतना मत सोचना दिल मे आता हूँ, दिमाग मे नही’, हा संवाद म्हटलं की एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, तो चेहरा म्हणजे बॉलिवूडचा ‘सुलतान’ सलमान खानचा. सलमानच्या चाहत्यांसाठी येणारी खुशखबर म्हणजे पुढच्या वर्षीच्या ईदसोबतच ख्रिसमसलाही त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट म्हणजे २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किक’चा सिक्वल. दिग्दर्शक साजिद नाडियादवालाने ‘किक २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. २०२१च्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘किक २’ सलमानसोबतच इतर कोणाच्या भूमिका असतील हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. पण या सिक्वलमध्ये तो दुहेरी भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘किक’मध्ये सलमानसोबतच जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. सलमान- जॅकलिनच्या केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. त्यामुळे आता सिक्वलमध्ये जॅकलिनच नायिका म्हणून झळकणार की दुसरी कोणती अभिनेत्री सलमानसोबत दिसेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 5:32 pm

Web Title: salman khans kick 2 release date revealed mppg 94
Next Stories
1 चिंधी ब्रँडची जाहिरात न करता कंगनाने विकत घेतली इमारत; बहिणीचा इतर कलाकारांना टोला
2 लोकप्रियतेमध्ये प्रियांका-दीपिकाला मागे टाकत ‘या’ अभिनेत्रीने मारली बाजी
3 ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नवज्योत सिंग सिद्धू परतले? पाहा व्हिडीओ..
Just Now!
X