06 July 2020

News Flash

पाकिस्तानमध्ये सुट्टीच्या दिवसांत सलमानच्या ‘किक’ची सर्वाधिक कमाई

सल्लुमियाँच्या 'किक'ने पाकिस्तानमध्ये सुट्टीच्या दिवसांतील चित्रपटांच्या कमाईचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

| August 1, 2014 07:49 am

सल्लुमियाँच्या ‘किक’ने पाकिस्तानमध्ये सुट्टीच्या दिवसांतील चित्रपटांच्या कमाईचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पाकिस्तानमध्ये ‘किक’ने ईदसह सुट्टीच्या दिवसांत तब्बल २.०८ कोटींची कमाई करत एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या तुफान प्रतिसादामुळे कराची भागातील चित्रपटगृहांमध्ये ‘किक’च्या शोची संख्या वाढवण्याची वेळ आली. आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही चित्रपटाला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाकिस्तानमधील अनेक चित्रपटगृहांचे मालक सांगत आहेत. सुट्टीच्या दिवसांतील ‘किक’चा जोर बघता, या चित्रपटाच्या प्रत्येक शो मागे चित्रपटगृहाच्या मालकांना तब्बल ६५,००० ते ७०,००० हजारांचा नफा झाला. ईदच्या मुहूर्तावर कराचीतील ५८ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किक’ने कमाईचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्डस मोडीत काढले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2014 7:49 am

Web Title: salman khans kick highest holiday grosser in pakistan
Next Stories
1 राजेश खन्ना यांच्या निकटवर्तिय अनिता अडवानी यांनी मानले न्यायव्यवस्थेचे आभार
2 पाहाः श्रेयसच्या ‘बाजी’चा ट्रेलर
3 ४०० कोटी रुपये पोटगीची बातमी सुझानला पडली महाग!
Just Now!
X