News Flash

सलमानचा ‘ मेंटल’ चित्रपट होणार २४ जानेवारीला प्रदर्शित

जानेवारीला चित्रपट गृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानचा हा चित्रपट ' स्टॅलिन' या प्रसिद्ध तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे.

| June 19, 2013 04:22 am

सलमान खानच्या निर्मिती संस्थेद्वारे बनत असलेला ‘ मेंटल’ हा चित्रपट २४ जानेवारीला चित्रपट गृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानचा हा चित्रपट ‘ स्टॅलिन’ या प्रसिद्ध तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. ईद दरम्यान आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सलमानचा हा चित्रपट यावेळी मात्र काही आरोंग्यविषयक आणि कायदेशीर बाबींमुळे प्रजासत्ताकदिनाच्या आसपास प्रदर्शित होत आहे.
सलमानने सदर चित्रपटाचे चित्रीकरण प्रजासत्ताक दिनापूर्वी पूर्ण करुन प्रदर्शित करण्याचा आग्रह सोहेल खानला केला आहे. सोहेल खानला याबाबत विचारले असता त्याने ही गोष्ट खरी असल्याचे सांगितले. तसेच आम्ही सतत चित्रीकरणाचे काम करत असून, तात्पुरती २४ जानेवारी ही चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित केली असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 4:22 am

Web Title: salman khans mental to release on january 24
Next Stories
1 गर्भलिंगनिदान प्रकरण : शाहरूख खानला पालिकेची ‘क्लिन चिट’
2 शाहरूख खान प्रथमच मराठी गाण्याच्या व्हिडिओत
3 बॉलीवुडमध्ये काम करण्यास आवडेल- जॅकी चॅन
Just Now!
X