12 December 2017

News Flash

‘ट्युबलाइट’मध्ये या भूमिकेत दिसेल सलमानची आई

सलमानकडून त्याच्या आईसाठी ही एक भेट असेल हे मात्र नक्की

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 2:41 PM

सलमान खान आईसोबत

सलमान खानच्या आयुष्यात कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी आणि त्याचे चाहते हे किती महत्त्वाचे आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे. तो स्वतः अनेक सार्वजनिक ठिकाणी याबद्दल आत्मियतेने बोलताना दिसतो. पण या सगळ्यांमध्ये तो सर्वात जवळ कोणाच्या असेल तर ती त्याची आई. सलमानला त्याच्या आयुष्यात अगदी आईसारखीच मुलगी हवी आहे असं तो वारंवार सांगतो.

सलमान आपल्या आयुष्यात आईच्या साथीनेच पुढे जाणं पसंत करतो. दरम्यान, सलमान खान प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्याने एक मोठा बदल केला आहे. याआधी सिनेमांच्या निर्मितीवेळी सलमान खान एवढंच नाव लिहिलं जायचं. पण आता त्याने प्रोडक्शन हाऊसमध्ये आईलाही सहभागी करुन घेतले आहे. ‘ट्युबलाइट’चे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, पोस्टरवर सलमान खानसोबतच त्याच्या आईचे नावही एक निर्माती म्हणून दिसते. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’च्या निर्मितीची जबाबदारी सलमानने आपल्या खांद्यावर घेतली आहे. पण हा सिनेमाची निर्मिती सलमान करत असला तरी निर्माती म्हणून तो आधी आपल्या आईचं नाव लावतो आणि मग आपलं. यापुढच्या सिनेमांमध्येही आईचं नाव आधी लावून नंतर आपलं नाव लिहिण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

Peace, Respect, Love and Light in your life from the Tubelight team .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

आतापर्यंत सलमानने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. पण, आता तो खुद्द आपल्या आईलाच सिनेसृष्टीत एक निर्माती म्हणून ओळख मिळवून देत आहे. सलमानचे आईवरचे प्रेम कोणापासून लपलेले नाही. पण सलमानकडून त्याच्या आईसाठी ही एक भेट असेल हे मात्र नक्की. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये आईचं नाव जोडणं ही एक जबाबदारीची गोष्ट आहे. निर्माती म्हणून आईचं नाव लावल्यामुळे सलमानला आता त्याचे आगामी सिनेमेही विचारपूर्वक निवडावे लागतील.

पूर्णपणे सलमानची निर्मिती असलेला ‘बजरंगी भाईजान’ हा पहिला सिनेमा. जेव्हाही सलमानला कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्याच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करण्यीच संधी मिळते तेव्हा तो तसे आवर्जून करतो. सलमानने याआधीच त्याची आगामी टूर, पीआर अॅक्टिव्हिटी, आगामी प्रोजेक्ट, जाहिराती करार या सर्व गोष्टी सोहेल सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Kya tumhe yakeen hai? Agar tumhe yakeen hai then 'Back his Back'

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

First Published on April 21, 2017 1:33 pm

Web Title: salman khans mom salma khan will be seen as a producer in film tubelight