06 July 2020

News Flash

पाहाः ‘प्रेम रतन धन पायो’च्या गाण्यावर हेलन, वहिदा रेहमान यांचा ठेका!

या गाण्याने बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रेहमान आणि हेलन यांना ठेका धरण्यास भाग पाडले.

सर्वाधिक डबस्मॅश बॉलीवूड गाण्याचा मान सोनम आणि सलमानच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातील गाण्याला मिळालेला आहे. या गाण्याला अधिकाधिक पसंतीही मिळतेय. इतकेच नाही तर या गाण्याने बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रेहमान आणि हेलन यांना ठेका धरण्यास भाग पाडले. या दोन्ही दिग्गज अभिनेत्री आपला पदर हातात घेऊन नृत्य करतानाचे डबस्मॅश सलमानने ट्विट केले आहे.


याआधी, सोनमने तिचे चाहते, मित्रमंडळी, स्टाफ आणि फोलोअर्सनी केलेले डबस्मॅश इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते. तसेच, सलमानचा भाऊ अरबाज खान यानेदेखील अमृता अरोरा आणि तिच्या पतीसोबत हा डान्सव्हिडिओ डबस्मॅश केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2015 1:40 pm

Web Title: salman khans mother helen veteran actress waheeda rahman dance to prem ratan dhan payo title track watch
टॅग Salman Khan
Next Stories
1 डोळे दिपवणारा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या पडद्यावर
2 माधुरी आणि ऐश्वर्यापेक्षा सोनम कपूर उजवी- सलमान खान
3 दीपिका रणबीरसोबत नाही, माझ्यासोबत दिसते हॉट- रणवीर सिंग
Just Now!
X