News Flash

‘भाईजान’च्या संकटात वाढ, पुन्हा मिळाली कायदेशीर नोटीस

जमीन खरेदी केल्यानंतर काही कारणास्तव कक्कड कुटुंबीय अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते

सलमान खान

‘रेस ३’ चित्रपटाच्या यशानंतर अन्य प्रोजेक्टसकडे वळलेला सलमान सध्या एका अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सलमानच्या मागे लागलेलं अडचणींच सत्र सुरुच असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.एका एनआरआय कुटुंबियांनी सलमानवर मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

 

पनवेलमध्ये सलमान खानचा एक फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊस लगतच अनिता आणि केतन कक्कड या दाम्पत्याची जमीन आहे. कक्कड कुटुंबियांनी १९९६ मध्ये ही जागा विकत घेतली होती. मात्र जमीन खरेदी केल्यानंतर काही कारणास्तव कक्कड कुटुंबीय अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. गेल्या १८ वर्षांपासून हे कुटुंब अमेरिकेमध्ये स्थायिक होतं. मात्र आता भारतात परतल्यानंतर त्यांना सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांमुळे त्रास होत असल्याचं ‘एबीपी’ने म्हटलं आहे.
कक्कड कुटुंबियांनी पनवेलमध्ये जिथे जागा घेतली आहे.त्याच्या बाजूला सलमानचा फार्महाऊस असून या फार्महाऊसच्या गेटवर बसविण्यात आलेल्या लोगोमुळे कक्कड कुटुंबियांना त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढे ते असंही म्हणाले, आमच्या आजूबाजूच्या घरांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत होतो. मात्र आमच्याच घरामध्ये वीजपुरवठा होत नाही असा दावा करत त्यांनी सलमानला कायदेशीर नोटीस बजावली आहे. दरम्यान, कक्कड कुटुंबियांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे न्याय मागितला असून त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 7:27 pm

Web Title: salman khans neighbour in panvel complaints khan family is mentally torturing
Next Stories
1 गोविंदाची भाची म्हणते मामाने कधीच नाही केली मदत!
2 ‘घाडगे & सून’ मालिकेत अमृताला मिळाली माई आणि अण्णांची साथ
3 दुबईतही ‘संजू’ची क्रेझ; प्रेक्षकांसाठी २४ तास सुरू राहणार चित्रपटगृहे
Just Now!
X