News Flash

आर्ट एक्झिबिशनमध्ये सलमानच्या चित्राचा समावेश; पोस्ट शेअर करत म्हणाला…

पोस्ट शेअर करत, सलमान म्हणाला...

अभिनेता सलमान खान याला अभिनयाप्रमाणेच गाण्याची आणि चित्रकलेचीदेखील तितकीच आवड आहे. अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या गाण्याची आणि चित्रांची चर्चा होत असते. यावेळीदेखील सलमान त्याच्या चित्रकलेमुळे चर्चेत आला असून त्याने रेखाटलेलं एक चित्र बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत सलमानने माहिती दिली आहे.

“विचित्र, उदासीनता, अभिमान आणि आनंद असे सारे काही भाव सध्या जाणवत आहेत. माझं काम इतक्या मोठ्या दिग्गज राजा रवि वर्मा, अबनिंद्रनाथ टागोर आणि व्ही.एस. गायतोंडे यांच्यासोबत डिस्प्ले होणार आहे. हा सन्मान देण्यासाठी मनापासून आभार”, अशी पोस्ट सलमानने शेअर केली आहे. सलमानने मदर तेरेसा यांच्यावर आधारित एक चित्र रेखाटलं आहे. या चित्रावर त्याने स्वाक्षरीदेखील केली आहे.


दरम्यान, हे प्रदर्शन २७ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात अनेक दिग्गजांचे चित्र ठेवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 12:12 pm

Web Title: salman khans painting display at an art exhibition in bengaluru ssj 93
Next Stories
1 सावधान! तुम्हालाही ‘असा’ मेसेज, कॉल किंवा ईमेल आला असेल तर…; केंद्र सरकारनेच दिला इशारा
2 VIDEO: ‘त्या’ दिवशी कसं पळवून लावलं पाकिस्तानी फायटर विमानांना? जाणून घ्या प्रत्येक मिनिटाचा थरार
3 हिंदू महिला माहेरच्या व्यक्तीला संपत्तीचा वारस म्हणून नेमू शकते; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Just Now!
X