काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयासमोर सलमान खानची बाजू मांडणारे त्याचे वकिल महेश बोरा यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. आज होणाऱ्या सलमान खानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीला मी उपस्थित राहू नये यासाठी मला धमकी मिळाली   आहे असे महेश बोरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आजच्या सुनावणीला मी उपस्थित राहू नये यासाठी मला एसएमएस आणि इंटरनेट कॉल करुन धमकावण्यात आले आहे असे मेहश बोरा यांनी सांगितले. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून आज सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे. सलमानला कालची रात्री जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात काढावी लागली.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर

कैदी नंबर १०६ असलेल्या सलमानला तुरुंगात कोणतीही विशेष वागणूक मिळणार नसल्याचे कालच तुरुंग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. सलमानला आज तुरुंग कैद्याचा गणवेश देण्यात येणार आहे. न्यायालयाने काल सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला.