News Flash

एडिटर सलमान खान!

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान काय काय करेल याचा काही नेम नाही.

| July 26, 2014 02:01 am

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान काय काय करेल याचा काही नेम नाही. कधी तो चित्र काढतो, तर कधी कविता लिहतो. त्याचे गायनाचे कौशल्यही ‘किक’ चित्रपटाद्वारे सगळ्यांसमोर आले. आता तर तो एडिटरही बनला आहे. ‘तमन्चे’ या आगामी चित्रपटासाठी त्याने निखिल द्विवेदीला चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये मदत केली. निखिल आणि सलमानची चांगली मैत्री असून सलमानने त्याच्या व्यस्त कामातून चित्रपटाच्या एडिटिंगसाठी वेळ काढला.
निखिल एक चांगला मुलगा आहे. मी त्याचा चित्रपट पाहिला आणि तो प्रेक्षकांनाही आवडेल. पण, त्यातील काही भाग कापण्याची गरज असल्याचे मला वाटले. बहुतेकवेळा आम्ही कलाकार महत्वाकांक्षी होतो आणि आम्ही चित्रपट मोठा करून टाकतो. दुसरीकडे दिग्दर्शकालाही वाटते ‘इसको काटूंगा तो इसको बुरा लगेगा’ म्हणून तेही तसचं सोडून देतात. त्यामुळे चित्रपटाचे व्यवस्थित एडिटिंग करणे हे आम्हा कलाकारांचेही कर्तव्य आहे, असे सलमान म्हणाला.
‘तमन्चे’ ही प्रेम कहाणी असून यात रिचा चड्डाची प्रमुख भूमिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 2:01 am

Web Title: salman turns editor for nikhil dwivedis tamanchey
Next Stories
1 कॉमनवेल्थ गेम्सच्या ओपनिंगमध्ये झळकली ग्लॅमरस ऐश्वर्या
2 ‘लॅक्मे फॅशन विक’साठी करिना मनिष मल्होत्राची शोस्टॉपर
3 चित्रनगरीः ‘अनवट.. एक अनपेक्षित’
Just Now!
X