सलमान खानची खरी प्रेयसी कोण?, यावर शिक्कामोर्तब होईपर्यंत त्या प्रेयसीपासून दुरावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. रोमेनियन मॉडेल ल्युलिया वांटूर सलमानच्या घरी राहायला आली तेव्हापासून तीच त्याची प्रेयसी अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सलमान आणि ल्युलियामध्ये केवळ मैत्री आहे, असा सूर त्याच्या निकटवर्तीयांनी आळवला होता. मात्र, बहीण अर्पिताच्या लग्नात त्याने ल्युलियाशी सगळ्यांची रीतसर ओळख करून दिली तेव्हा कुठे त्याची खरी प्रेयसी कोण हे उलगडले. मात्र, व्हिसाच्या अडचणींमुळे या खऱ्या प्रेयसीपासून त्याला दूर राहावे लागणार आहे.
ल्युलियाशी ओळख झाल्यानंतर काही महिन्यांतच ती सलमानच्या वांद्रे येथील घरात अवतरली. तेव्हापासून ती तिथेच राहते आहे. मात्र, सलमान आणि ल्युलियात फक्त मैत्री आहे, असेच सांगितले जात होते. अर्पिताच्या विवाह समारंभात देशी पोषाखातल्या ल्युलियाने सगळ्यांचे लक्ष वेधून गेले. खुद्द सलमानने तिची प्रत्येकाशी ओळख करून दिली. तेव्हा सलमान ‘खान’दानाच्या बाहेरच्यांनाही या प्रेमी युगुलाची कुणकुण लागली. यावर्षीच्या ईदच्या समारंभातच तिने सलमानच्या घरच्यांची मने जिंकली होती. ईदच्या निमित्ताने घरी आलेल्या प्रत्येकाचे तिने खास स्वागत केले, त्यांच्या पाहुणचाराची व्यवस्थाही तिनेच सांभाळली होती. तेव्हापासून सलमानच्या घरची मंडळी तिच्यावर बेहद्द खूष असून तिला ‘खान’दानाची सदस्य म्हणून मान्यताही मिळाली होती, असे बोलले जाते.  मात्र, ल्युलियाच्या व्हिसाची मुदत संपत आली असून तिला लवकरच रोमेनियात परतावे लागणार आहे. ल्युलियाचा व्हिसा वाढवून मिळावा, यासाठी सलमानने बराच खटाटोप केला. पण, तिला सहजी मुदतवाढ मिळणे शक्य नाही एवढेच त्याला आता लक्षात आले आहे. हणूनच सध्या तरी ल्युलियाला ‘खान’दान सोडून रोमेनियाला परत जावे लागणार आहे. ल्युलियाचे जाणे इतक्या लवकर घडते आहे की ३० डिसेंबरला सलमानच्या वाढदिवसालाही ती भारतात नसणार आहे. या सगळया घटनाक्रमामुळे ‘भाई’ची अवस्था फारच दयनीय झाली आहे.