सलमान खानच्या एका नातेवाईकाकडून डॉक्टर तरुणीची छेडछाड होत असल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुला मिर्झा खान असे त्याचे नाव असून लग्नासाठी गेल्या दीड वर्षापासून मानसिक त्रास देत असून फेसबुक व ई-मेलवरुन आपल्याबाबत अश्लिल पोस्ट केल्याची तक्रार या तरुणीने केलेली आहे.
आरोपी अब्दुल्ला मिर्झा खान सलमानचे वडील समील खान यांच्या बहिणीचा मुलगा आहे.  अब्दुल्लाने पिडीत तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, असाही आरोप आहे. मात्र तिने त्याच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर आरोपी तरुणीला मेल, व्हाट्सअॅप, एसएमएस आणि फोन करून त्रास देत होता. अखेर संबंधित तरुणीने शुक्रवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात अब्दुला याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्याच्यावर छेडछाड, विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.