News Flash

प्रतिक्षा संपली! स्वप्नील जोशीची ‘समांतर २’ वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'समांतर २'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेब सीरिजच्या पहिल्या सिझननंतर प्रेक्षक दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते.

भारतात वेब सीरिजचा ट्रेंड चांगलाच वाढलाय. प्रेक्षकांची वेब सीरिजला मोठी पसंती मिळताना दिसते. यात मराठीमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली बेव सीरिज म्हणजे ‘समांतर’. स्वप्नील जोशीच्या ‘समांतर’ या वेब सीरिजने प्रेकक्षकांची मोठी पसंती मिळवली होती. या वेब सीरिजचं खिळवून ठेवणारं कथानक आणि प्रत्येक रहस्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरसं. या वेब सीजिच्या पहिल्या सिझननंतर प्रेक्षक दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपती आहे. कारण लवकरच हा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘समांतर-२’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा वाढू लागली आहे. शोच्या पहिल्या सिझनमध्ये स्वप्नील जोशीने साकारलेल्या कुमार महाजनने नितेश भारद्वाज यांचा म्हणजेच म्हणजेच सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती.

एका उत्कंठावर्धक वळणावर हा शो संपल्याने आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतूर होते. ही उत्सुकता अधिक न ताणता  ‘समांतर २’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हे देखील वाचा: अनुष्का शर्माचा नो मेकअप लूक व्हायरल, आईची ड्यूटी सांभाळत करतेय वर्कआउट

दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल? हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी मराठी एमएक्स ओरिजिनलवर ‘समांतर २’चा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

या शोच्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते. तर, ‘समांतर 2’ चं दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 1:27 pm

Web Title: samantar 2 marathi web series teaser out will release soon swapnil joshi nitish bharadwaj slove the mystery kpw 89
Next Stories
1 कियाराने पुन्हा एकदा डब्बू रत्नानीसाठी केलं ‘टॉपलेस’ फोटोशूट
2 ‘ये काली काली आंखे गाण्यात काजोलला पाहून…’, २८ वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने केला खुलासा
3 एका मिनिटात ४० पुशअप्स करत मिलिंद सोमण देतोय तरुणांना टक्कर
Just Now!
X