News Flash

“कलाकारांच्या मतांना कधीपासून एवढी किंमत आली?”, ‘या’ अभिनेत्रीचा माध्यमांना सवाल!

सोशल मीडियावरच्या चॅलेंजमध्ये झाली सहभागी

आपल्या अभिनयाने आणि मनमोहक अदांनी अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलेलं आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतल्या आपल्या भूमिकांमधून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि त्यांचं मन जिंकत आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत एक प्रश्न उपस्थित केला आहे.

समंथाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने सोशल मीडियावरच्या ‘What did I say’ या चॅलेंजमध्ये भाग घेतलेला दिसून येत आहे. कलाकारांना त्यांच्या मतांवरुन, स्वतंत्र मते असणे किंवा नसणे यावरुन माध्यमं त्यांना जज करतात, यावरुन तिने हा प्रश्न उपस्थित केला आहे.

या व्हिडिओत ती म्हणते की, कलाकारांच्या मतांना कधीपासून एवढी किंमत द्यायला लागले?
तिच्या या व्हिडिओत काही वाक्ये दिसत आहेत.

ती अशीः
“ते- आम्हाला तुमचं या महत्त्वाच्या विषयावरचं मत जाणून घ्यायचं आहे.
मी(आश्चर्याने मनातल्या मनात)- कलाकारांच्या मतांना कधीपासून एवढी किंमत द्यायला लागले?”
समंथाने या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही दिलं आहे. यात ती म्हणते, “आम्ही मनोरंजन करणारे आहोत, सत्य पडताळून पाहणारे नाही.” जगातल्या महत्त्वाच्या विषयांवरच्या कलाकारांच्या मतांसाठी त्यांना सुळावर का चढवलं जातं? याबद्दलही तिने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ती पुढे म्हणते, “आम्हीही माणूस आहोत आणि आमच्याकडूनही चुका होतात. पण आम्हाला एखाद्या विषयावर बोलायला भाग पाडणं किंवा बोलत नसू तर प्रत्येक विषयावर बोलायलाच लावणं हे चुकीचं आहे असं नाही वाटत का? आम्ही सर्वाोत्तम काय करतो याकडे लक्ष केंद्रित करुया. आम्ही आमच्या कामाने, कलेने तुम्हाला आमच्या प्रेमात पडायला भाग पाडतो. #whatdidisay हे तुमच्या मनातलं बोलण्याचं एक मजेदार माध्यम आहे. तुमच्या मनात काय चाललंय?”

तिच्या सहकलाकारांनी, त्याचसोबत या क्षेत्रातल्या इतर काही जणांनी या गोष्टीला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री यामी गौतम आणि प्रग्या जयस्वाल यांनीही समंथाच्या मतांना सहमती दर्शवली आहे.

सध्या इन्स्टाग्रामवर ‘What did I say’ हे चॅलेंज ट्रेंडिंगवर आहे. या चॅलेंजच्या माध्यमातून लोक आपल्याबद्दलची लोकांची मतं किंवा समाजाचा विरोधाभासी दृष्टिकोन याबद्दल बोलत आहेत. समंथानेही यात भाग घेत आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे.

समंथा सध्या ‘शाकुंतलम’ या चित्रपटाचं चित्रीकऱण करत आहे. ती लवकरच वेबविश्वातही पदार्पण करत आहे. ‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 11:55 am

Web Title: samantha akkineni about media judging actors on having opinions vsk 98
Next Stories
1 ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेचा ‘मानापमान’ रुपेरी पडद्यावर
2 मलायका आणि अर्जुनचा झाला साखरपुडा? अंगठी पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
3 ‘आईला सांग कमी मुलं जन्माला घाल’, भीक मागणाऱ्या मुलांना मदत करत राखीने दिला सल्ला
Just Now!
X