28 October 2020

News Flash

टॉलिवूडची सुपरहिट जोडी; अशी आहे नागार्जुनच्या मुलाची लव्हस्टोरी

समंथा व नागा चैतन्यची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे.

नागा चैतन्य- समंथा रुथ प्रभू

बॉलिवूडप्रमाणेच टॉलिवूडचं प्रस्थही गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. अशा या चित्रपटसृष्टीतील सर्वांच्याच आवडीची जोडी म्हणजे समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य. २०१७ मध्ये ही बहुचर्चित जोडी विवाहबंधनात अडकली आणि बॉलिवूड सेलिब्रिटीप्रमाणेच यांचाही विवाहसोहळा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत होता. समंथा व नागा चैतन्यची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. पहिल्यांदा जेव्हा हे दोघं एकमेकांना भेटले, तेव्हा दोघंही दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये होते.

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समंथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समंथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. या लग्नसोहळ्यासाठी जवळपास १० कोटींचं बजेट ठेवण्यात आलं होतं.

या ‘बिग फॅट वेडिंग’मध्ये समंथा- नागा चैतन्यने हिंदू रितीरिवाजांप्रमाणे लग्नगाठ बांधली. त्यानंतर पुन्हा ख्रिस्ती रितीरिवाजांप्रमाणे त्यांनी एकमेकांची साथ देण्याचं वचन घेतलं. गोव्यात हा सोहळा पार पडल्यानंतर हैदराबादमध्ये ‘ग्रँड रिसेप्शन’चं आयोजन करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2019 5:31 pm

Web Title: samantha and naga chaitanya love story ssv 92
Next Stories
1 कॅन्सरमुक्त झाल्यानंतर ऋषी कपूर यांचं दमदार कमबॅक
2 ‘बाथरुमध्ये कोंडून ठेवायचा बॉयफ्रेंड’, बिग बॉसच्या घरात कोयनाने सांगितली आपबिती
3 ”आज त्यांचा प्रवास संपतोय, कालांतराने तुमचा संपेल”
Just Now!
X