16 December 2017

News Flash

समंथा-नागा चैतन्यच्या ‘बिग फॅट’ वेडिंगचं बजेट माहितीये का?

गोव्यात हा सोहळा पार पडल्यानंतर हैदराबादमध्ये 'ग्रँड रिसेप्शन'चं आयोजन करण्यात आलं आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 10:21 AM

समंथा रुथ प्रभू, नागा चैतन्य

बॉलिवूडप्रमाणेच टॉलिवूडचं प्रस्थही गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. अशा या चित्रपटसृष्टीतील सर्वांच्याच आवडीची जोडी अवघ्या काही तासांनंतर विवाहबंधंनात अडकणार असून, त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लग्नाच्या बेडीत अडकणार असून, गोव्यात हा विवाहसोहळा पार पडेल. सध्या त्यांच्या लग्नाची तयारी शेवटच्या टप्प्यात अली असून, पाहुण्यांची ये- जा सुरु झाली आहे. ६ ते ९ ऑक्टोबर या दिवसांमध्ये ‘समचै’ म्हणजेच समंथा आणि नागा चैतन्यच्या डेस्टिनेशन वेडिंगची रंगत पाहायला मिळेल.

‘हिंदुस्तान टाईम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या लग्नसोहळ्यासाठी जवळपास १० कोटींचं बजेट ठेवण्यात आलं असून, त्याअंतर्गत विविध गोष्टींचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबादहून गोव्याला येण्यासाठी एका खास विमानाची सोयही करण्यात आली आहे. या लग्नसोहळ्याला तेलगु चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध चेहऱ्यांची उपस्थिती असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये अभिनेता चिरंजीवी, प्रभास, महेश बाबू, बाळकृष्ण, अल्लू अर्जुन, राम चरण या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.

या ‘बिग फॅट’ वेडिंगमध्ये ६ तारखेला समंथा- नागा चैतन्य हिंदू रितीरिवाजांप्रमाणे लग्नगाठ बांधलीत. त्यानंतर पुन्हा ख्रिस्ती रितीरिवाजांप्रमाणे ते एकमेकांची साथ देण्याचं वचन घेतील. गोव्यात हा सोहळा पार पडल्यानंतर हैदराबादमध्ये ‘ग्रँड रिसेप्शन’चं आयोजन करण्यात आलं आहे.
या विवाहसोहळ्यासाठी प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष देण्यात येत आहे. समंथा- नागा चैतन्यच्या कपड्यांपासून ते अगदी विधी आणि पाहुण्यांची उठबस या सर्व गोष्टींवर विशेष भर दिला जात आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

❤️

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

या विवाहसोहळ्यासाठी चाहत्यांसोबतच तेलगु चित्रपटसृष्टीतही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. त्यामुळे त्यांच्या लग्नात इंडस्ट्रीतील बरेच प्रसिद्ध चेहरे दिसणार यात शंका नाही. लग्नानंतर हे नवविवाहित दांपत्य फार मोठ्या सुट्टीवर जाणार नसून, काही दिवसांतच ते पुन्हा आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र होणार आहेत.

First Published on October 5, 2017 10:21 am

Web Title: samantha ruth prabhu and naga chaitanya wedding budget might touches rs 10 crore