15 December 2017

News Flash

…अन् समंथाची ओळख बदलली

गेल्या आठवड्यात समंथा- नागा चैतन्य लग्नबंधनात अडकले.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 13, 2017 11:24 AM

समंथा रुथ प्रभू

गेल्या आठवड्यात टॉलिवूडची प्रसिद्ध जोडी ‘चैसम’ म्हणजेच नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू हे लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेल्या या ‘लव्ह बर्ड्स’ने गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही विवाहपद्धतीनुसार लग्न केले. या सोहळ्याला दोघांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहिले होते. गोव्यातील ‘डब्ल्यू रिसॉर्ट’मध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आता ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर समंथाने तिचे आडनाव बदलून अक्किनेनी असे केले.

समंथाने आडनाव बदलल्यानंतर ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अनेकांनी तिचे कौतुक केले. काहींनी ‘आडनाव बदलून भारतीय संस्कृतीसाठी तुझ्या मनात असलेला आदर दाखवलास,’ अशी कमेंट केली. लग्नानंतर समंथा आणि नागा चैतन्य दोघेही आपापल्या कामात व्यग्र झाले आहेत. समंथाचा ‘राजू गारी गांधी २’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे तर नागा चैतन्य त्याच्या आगामी ‘सव्यसाची’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाला आहे.

वाचा : टेलिव्हिजनवरही बिग बीच ‘शहेनशहा’

समंथा आणि नागा चैतन्यचे लग्न हा यावर्षीचा सर्वांत जास्त चर्चेचा विषय ठरला. या लग्नाबद्दलच्या लहानसहान गोष्टी जाणून घेण्यासाठी दोघांचे चाहते उत्सुक होते. दोघांच्या साखरपुड्यापासूनच या जोडीला भावी आयुष्यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती.

One true love ❤️❤️❤️

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

First Published on October 13, 2017 11:24 am

Web Title: samantha ruth prabhu changes her surname to akkineni post marriage