दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा अक्किनेनी. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सध्या समंथा मलादीवमध्ये सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर करत मालदीवला असल्याचे सांगितले आहे.
समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिने फ्लोरल प्रिंट असलेला ड्रेस परिधान केला आहे तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती स्कूबा डायविंग करताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.
फोटो: नागार्जुनची सून अभिनेत्री समांथा अक्किनेनीचे आलिशान घर एकदा नक्की पाहा
View this post on Instagram
View this post on Instagram
स्कूबा डायविंगवाला फोटो शेअर करत समंथाने ‘अखेर मी करुन दाखवलं’ असे कॅप्शन दिले आहे. त्यापूर्वी शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मालदीवला पोहचल्याचे दिसत आहे. सध्या तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला देखील काही फोटो शेअर केले होते.
समंथाने दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केले आहे. त्यांची २०१०मध्ये ओळख झाली होती. आजवर तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती ‘द फॅमिली मॅन २’ या हिंदी वेब सीरिजमध्ये काम करणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 23, 2020 2:17 pm