News Flash

समीर धर्माधिकारी आणि मंगेश देसाईं यांचा ‘वाजवूया बँड बाजा’

समीर धर्माधिकारी आणि मंगेश देसाई हे दोघेही 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

टॉल, डार्क अँड हँडसम लूकने तरुणींच्या ह्रदयावर राज्य करणारा समीर धर्माधिकारी ‘वाजवुया बँड बाजा’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने समीर पहिल्यांदाच एका विनोदी अंदाजात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शिवाजी लोटन पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. समीर व्यतिरीक्त अभिनेते मंगेश देसाई हे देखील चित्रपटात लग्नाळू तरुणाच्या भूमिकेत दिसतील. समीर धर्माधिकारी आणि मंगेश देसाई हे दोघेही ‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

संदीप आणि अमित या दोन भावांच्या लव्हस्टोरीचा धुमधडाका ‘वाजवूया बँड बाजा’ चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समीर धर्माधिकारींनी वठवलेला संदीप एक शिक्षक असून समाजात चांगले विद्यार्थी घडवणं हे आपलं आद्य कार्य मानणाऱ्या संदीपच्या आयुष्यात आई आणि आपल्या बालमैत्रिणीव्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रियांना प्रवेश नाही. तर मंगेश देसाईंनी साकारलेला अमित हा गावातला एकुलता एक कंपाउंडर कम डॉक्टर असून ज्या डॉक्टरकडे अमित प्रॅक्टिस करतोय त्याच डॉक्टरच्या मुलीच्या प्रेमात घायाळ झाला आहे. संदीप आपल्या बालमैत्रिणीसमोर आपल्या प्रेमाची ग्वाही देतो का? अमितच्या प्रेमाची साक्ष डॉक्टरच्या मुलीला पटते का? पर्यायने संदीप आणि अमित या दोघा भावांचे प्रेम यशस्वी होतेत का? या प्रश्नाची उत्तरे ‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटात पाहता येणार आहे.

संदीप नाईक यांनी ‘वाजवुया बँड बाजा’ची मजेशीर कथा लिहिली आहे तर पटकथा-संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. छायाचित्रण नागराज दिवाकर यांचे असणार आहे. संगीत-विजय गटलेवार, गायक-आदर्श शिंदे, संकल-निलेश गावंड आणि कलादिग्दर्शक-संतोष समुद्रे अशी इतर श्रेयनामावली आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला आपलं प्रेम यशस्वी होणार का ह्या सर्वसामान्य प्रश्नाची धाकधूक असतेच असते. ‘वाजवूया बँड बाजा’ त्यावर जरा गंमतीशीर पद्धतीने भस्य करतो. हा चित्रपट तरुणांना नक्कीच भावेल अशी निर्माते -दिग्दर्शकांना आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 6:37 pm

Web Title: sameer dharmadhikari mangesh desai vajvuya band baja marathi movie mppg 94
Next Stories
1 कितीही नाकारलं तरी समाजात वर्णभेद हा आहेच- हर्षदा खानविलकर
2 कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी
3 ‘हिरकणी’मध्ये आशा भोसलेंच्या जादुई आवाजात गायली जाणार ‘आईची आरती’
Just Now!
X