News Flash

Video: फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केलेल्या सनाने केला मौलाना मुफ्ती अनसशी निकाह

पाहा व्हिडीओ..

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची को-स्टार आणि बिग बॉसची स्पर्धक सना खानने काही दिवसांपूर्वी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. तिच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला. आता सनाने निकाह केल्याचे समोर आले आहे.

सना खानने गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला आहे. तिच्या लग्नातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये सना खान आणि मुफ्ती अनस हे पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. सना या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. दरम्यान त्यांनी केक देखील कापला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सना खानने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते. त्यानंतर तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर इंस्ट्रीसोडत असल्याचे सांगितले होते.

काय होती सनाची पोस्ट?
‘आज मी माझ्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि त्या काळात मला प्रसिद्धी, पैसा, सन्मान या सर्व गोष्टी मिळाल्या. पण पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे धावणं हा एकमेव जगण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न मला सतावू लागला. गरजू व्यक्तींना मदत करण्याचं कर्तव्य प्रत्येकाचं नाही का? या प्रश्नांची उत्तर मी बऱ्याच काळापासून शोधत होते. जेव्हा मी माझ्या धार्मिक शिकवणीत या प्रश्नांची उत्तर शोधली, तेव्हा मला समजलं की फक्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणं हाच आयुष्याचा एकमेव उद्देश नाही. त्यामुळे मी आजपासून फिल्म इंडस्ट्रीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेते आणि यापुढे मी लोकांची, गरजूंची सेवा करेन.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 11:13 am

Web Title: sana khan after quitting film industry married to maulana mufti anas marriage videos viral avb 95
Next Stories
1 वयाच्या १०व्या वर्षी लैंगिक शोषणाची बळी ठरली होती गायिका नेही भसीन
2 भारती सिंहच्या अटकेनंतर कपिल शर्मावरून मीम्स व्हायरल
3 चित्ररंजन : नशिबाचे गरगरते फासे
Just Now!
X