News Flash

अभिनेत्रीनं करोना टेस्टचा व्हिडीओ केला शेअर; काही तासांत मिळाले लाखो व्हूज

५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सना खान हिनं देखील करोनाची चाचणी दिली आहे.

अवश्य पाहा – VJ ते प्रसिद्ध अभिनेत्री; ७ वर्षात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या चित्राची आत्महत्या

सना अलिकडेच हनीमून साजरा करण्यासाठी काश्मीर येथे गेली होती. त्यावेळी तिनं श्रीनगर येथील विमानतळावर करोना चाचणी दिली. या चाचणीचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे काही तासांत १४ लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. दरम्यान सनाच्या अनेक चाहत्यांनी तिला कळजी घेण्याचा देखील सल्ला दिला आहे.

अवश्य पाहा – Forbes List 2020: सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत बॉलिवूडचाच दबदबा

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

अवश्य पाहा – “कृपया मला माफ करा”; वायु सेना संतापताच अनिल कपूर यांनी मागितली माफी

५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

महाराष्ट्रात दिवसभरात ५ हजार १११ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ४२ हजार १९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४५ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ४ हजार ९८१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 6:09 pm

Web Title: sana khan covid 19 test viral video mppg 94
Next Stories
1 ‘बबड्या.. फोन उचल.. हे लोकं काहीपण बोलत आहेत..’; अतुल गोगावले भावूक
2 काय? कमाल आर. खान करणार आत्महत्या? अभिनेत्याने सोडलं मौन
3 ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे १०० भाग पूर्ण
Just Now!
X