News Flash

निकाहनंतर पहिल्यांदाच पतीसोबत फिरायला गेली सना, पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ...

अभिनेत्री सना खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. या चर्चा तिने निकाहनंतर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे सुरु झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ‘इस्लाम’साठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे निकाह करत असल्याचे सांगितले होते. आता तिचा पहिल्यांदाच पतीसोबत बाहेर फिरायला जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

नुकताच सनाच्या एका फॅन पेजने सनाचा पती मौलाना मुफ्ती अनससोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पतीसोबत एका कारमध्ये बसली असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

पाहा फोटो : झायरा वसिम ते सना खान, ‘या’ कलाकारांनी ठोकला चित्रपटसृष्टीला रामराम

 

View this post on Instagram

 

A post shared by Jasus007 (@jasus007)

सनाने २० नोव्हेंबर रोजी गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सना खानने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते. त्यानंतर तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर इंस्ट्रीसोडत असल्याचे सांगितले होते. आता सनाने निकाह केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 5:01 pm

Web Title: sana khan goes out for car ride with husband anas sayied avb 95
Next Stories
1 झी युवावर रविवारी उडणार ‘धुरळा’
2 “वेदनादायी गोष्ट हीच की, जवानही शेतकऱ्याचाच मुलगा”, स्वरा भास्करचं टि्वट
3 Coolie no. 1 trailer : गोविंदा की वरुण? ट्रेलर पाहून तुम्हीच ठरवा कोण आहे ‘कुली नं. १’
Just Now!
X