News Flash

“इस्लाम मेक अप करण्याची परवानगी देतं का?” धर्मासाठी बॉलिवूड सोडणारी सना होतेय ट्रोल

इस्लामसाठी या अभिनेत्रीनं बॉलिवूडला ठोकला रामराम

बॉलिवूड अभिनेत्री सना खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीने चक्क इस्लामसाठी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. गेल्या काही काळात धर्मासाठी मनोरंजनसृष्टी सोडणारी ती दुसरी अभिनेत्री ठरली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतल्यानंतर सनाने चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. मात्र या व्हिडीओमधील तिचा लूक काही प्रेक्षकांना आवडला नाही. व्हिडीओमध्ये केलेल्या मेकअपमुळे सध्या तिला ट्रोल केलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

. . . We all need to keep reminding ourselves that our main purpose in this life is to “PLEASE ALLAH” and no one else

A post shared by Sana Khan (@sanakhaan21) on

“आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे? प्रत्येक मनुष्याची देवाच्या प्रती काही कर्तव्य असतात. उर्वरीत आयुष्यात ती कर्तव्य आता मी पूर्ण करणार आहे.” अशा आशयाचं वक्तव्य सनाने या व्हिडीओमध्ये केलं. मात्र तिचा हा व्हिडीओ काही प्रेक्षकांना आवडला नाही. “व्हिडीओसाठी मेकअप करण्याची परवानगी कुराणमध्ये दिली आहे का?” अशा आशयाच्या कॉमेंट करुन सना खानला सध्या ट्रोल केलं जात आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडयावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी सना खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “आज मी माझ्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि त्या काळात मला प्रसिद्धी, पैसा, सन्मान या सर्व गोष्टी मिळाल्या. पण पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे धावणं हा एकमेव जगण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न मला सतावू लागला. गरजू व्यक्तींना मदत करण्याचं कर्तव्य प्रत्येकाचं नाही का? या प्रश्नांची उत्तर मी बऱ्याच काळापासून शोधत होते. जेव्हा मी माझ्या धार्मिक शिकवणीत या प्रश्नांची उत्तर शोधली, तेव्हा मला समजलं की फक्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणं हाच आयुष्याचा एकमेव उद्देश नाही. त्यामुळे मी आजपासून फिल्म इंडस्ट्रीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेते आणि यापुढे मी लोकांची, गरजूंची सेवा करेन.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:56 pm

Web Title: sana khan trolled due to wearing makeup after quitting the entertainment industry mppg 94
Next Stories
1 ‘तुमच्यावर हल्ला करणारे लोकं…’, तनिष्कच्या जाहिरातीवरुन ट्रोल करणाऱ्यांना चेतन भगत यांचे उत्तर
2 ‘तारक मेहता..’मध्ये लवकरच नट्टू काकांचं कमबॅक; ‘या’ दिवशी होणार मालिकेत एण्ट्री
3 मनिषा कोईरालाला करोनाची लागण?; चाहत्यांच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं उत्तर
Just Now!
X