04 December 2020

News Flash

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळली

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री तुरुंगातच राहणार

सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरुमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री संजना गलरानी आणि राघिनी द्विवेदी यांना अटक करण्यात आली. या दोन्ही अभिनेत्रींची सध्या सखोल चौकशी सुरु आहे. दरम्यान या अभिनेत्रींनी जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. सध्या या दोन्ही अभिनेत्री न्यायालयीन कोठडीत आहेत.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केले न्यूड फोटो; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

प्रकरण काय आहे?

सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. या ठिकाणी त्यांना एक डायरी सापडली होती. या डायरीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील १५ सेलिब्रिटींची नावं आहेत. डायरीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आठ सप्टेंबरला पोलिसांनी राघिनी द्विवेदी हिच्या घरी छापा टाकला व तिला अटक केली. त्यानंतर चौकशीदरम्यान संजना गलरानीचं नाव समोर आलं. परिणामी तिला देखील अटक करण्यात आली. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणात चौकशी सुरु आहे. तसंच या प्रकरणाचे सुत्रधार विदेशात असल्याचा संशय त्यांना आहे. या ड्रग्स गँगमध्ये संजनाची भूमिका काय आहे? याचा तपास केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 4:25 pm

Web Title: sandalwood drug case no bail ragini dwivedi sanjjanaa galrani mppg 94
Next Stories
1 सलमानची ही हिरोईन होती प्रभासची क्रश, ‘या’ चित्रपटात साकारणार आईची भूमिका
2 Video : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेविषयी ‘त्या’ वक्तव्याबद्दल अलका कुबल यांनी मागितली माफी
3 पवित्रा-एजाजचं नातं म्हणजे…; काम्या पंजाबी संतापली
Just Now!
X