01 December 2020

News Flash

हैदराबाद बलात्कार प्रकरणावर ट्विट केल्यानंतर ‘कबीर सिंग’चा दिग्दर्शक ट्रोल

ढोंगी म्हणत नेटकऱ्यांनी दिग्दर्शकाला सुनावले.

संदीप रेड्डी वांगा

हैदराबाद बलात्कार प्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाल्यानंतर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा ट्रोलचे शिकार झाले. ढोंगी म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. टीका करताना नेटकऱ्यांनी त्यांना ‘कबीर सिंग’ व ‘अर्जुन रेड्डी’ यांसारखे चित्रपट न बनवण्याचा सल्लाही दिला.

‘भीती ही एकमेव गोष्ट आहे जी समाजातील काही गोष्टी मूळापासून बदलू शकते आणि भीती हाच नवीन नियम असावा. क्रूर शिक्षाच अशा घटना घडण्यापासून रोखू शकते. आता देशातील प्रत्येक मुलीला खात्रीशीर हमीची गरज आहे. पोलिसांनी तातडीने काम करावे अशी माझी विनंती आहे’, असं ट्विट संदीप रेड्डी वांगा यांनी केलं. यावर अनेकांनी राग व्यक्त केला. ‘कबीर सिंग’, ‘अर्जुन रेड्डी’ यांसारख्या चित्रपटांमुळे समाजात चुकीचा संदेश पसरतो, असंही नेटकऱ्यांनी त्यांना सुनावलं.

संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचे हिंदी रिमेक करण्यात आले. ‘कबीर सिंग’ हा हिंदी चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर खूप गाजला पण तेवढीच त्यावर टीका झाली. चित्रपटात महिलेला दुय्यम भूमिका दिल्याच म्हणत काही दृश्यांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता.

हैदराबाद बलात्कार प्रकरण काय आहे?

हैदराबाद येथे गुरुवारी एका नाल्याजवळ सत्तावीस वर्षांच्या महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. तत्पूर्वी ती बेपत्ता झाल्याची तक्रार होती. तिच्या लहान बहिणीने याबाबत पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले होते, की तिच्या बहिणीचा बुधवारी रात्री ९.२२ वाजता फोन आला होता. ती टोल नाक्यावर अडकून पडली असून कुणीतरी तिला तिच्या स्कूटरचे टायर पंक्चर असल्याचे सांगून मदतीचा प्रयत्न केला. नंतर या सगळ्या प्रकारात मदतीच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करून तिला जाळून टाकल्याचे निदर्शनास आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 10:01 am

Web Title: sandeep reddy vanga faces heat to his tweet on hyderabad vet rape case ssv 92
Next Stories
1 स्वत:च्या बायोपिकमध्ये सौरव गांगुलीला हवा ‘हा’ अभिनेता
2 Happy Birthday : अभिनेत्री नसतीस तर काय?, कोंकणाने दिलं हे उत्तर
3 नेहा पेंडसेच्या लग्नाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Just Now!
X