24 November 2020

News Flash

संदीप सिंहचा कंगना आणि रंगोलीसोबत फोटो व्हायरल

संदीपने तो सुशांतचा जवळचा मित्र असल्याचे म्हटले होते.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा कथित मित्र संदीप सिंह चर्चेत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संदीपने रुग्णवाहिका चालकाशी १४ जून आणि १६ जून रोजी फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर सुशांतच्या वकिलांनी सुशांतचे कुटुंबीय संदीपला ओळखत नसल्याचे म्हटले होते. आता सोशल मीडियावर संदीपचा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.

ट्विटरवर एका यूजरने संदीपचा कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिघेही हसताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ते तिघे चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे. तर कंगनाच्या काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण या फोटोबाबत इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीपने तो सुशांतचा चांगला मित्र असल्याचे म्हटले होते. पण सुशांतच्या कुटुंबीयांनी ते संदीपला ओळखत नसल्याचे म्हटले. तसेच संदीपला अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विट करत संदीपशी संबंधीत काही प्रश्न विचारले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 12:08 pm

Web Title: sandip singh photo is going viral with kangana ranaut and rangoli chandel avb 95
Next Stories
1 सुशांत होता आर्थिक संकटात?; रियाची ऑडिओ क्लिप व्हायरल
2 निया शर्मा ठरली ‘खतरों के खिलाडी मेड इन इंडिया’ची विजेती
3 रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी
Just Now!
X