‘संगीत देवबाभळी’ या नाटकाद्वारे घराघरात पोहचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते प्रेक्षकांना आता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत शुभांगी एका महिला पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘संगती देवबाभळी’ प्रमाणेच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतील मोक्षदा या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी आशा तिला आहे.

मोक्षदा ही पोलिसाची भूमिका साकारताना आनंद होत असल्याचं शुभांगी म्हणाली आहे. “मोक्षदा ही प्रत्येक घटनेचा आणि गुन्ह्यांचा सगळ्या बाजूने विचार करते आणि मगच तिचं मत मांडते. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तिच्या मनात प्रचंड राग आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये तिची दहशत आहे. खऱ्या आयुष्यातही जर अन्यायाचा प्रसंग माझ्यासमोर उभा ठाकला तर माझ्यातली मोक्षदा जागी होते.” असं शुभांगी यावेळी म्हणते.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
shweta shinde recall college days memories and connection with kareena kapoor and vivek oberoi
मराठमोळ्या श्वेता शिंदेचं शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय अन् करीनाबरोबर आहे खास कनेक्शन; म्हणाली, “हे कलाकार तेव्हा…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

 

शुभांगीने तिच्या सोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितलं आहे. “शूटिंगहून घरी जात असताना तिने रिक्षा बुक केली. त्या रिक्षावाल्याने तिला जवळपास एक तास चुकीच्या दिशेने फिरवलं. त्याला त्याच्या चुकीची जाणीव करुन देण्यासाठी शुभांगीने रौद्ररुप धारण केलं आणि त्याला पैसेच दिले नाहीत. अश्या परिस्थितीत घाबरुन न जाता धैर्याने सामना करायला हवा असं शुभांगी म्हणते.

तर पोलिसांची भूमिका साकारत असताना जेव्हा पोलिसांची वर्दी अंगावर चढवली तेव्हा पोलिसांच्या मेहनतीची आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली असंही ती म्हणाली आहे. 7 मार्च पासून ‘नवे लक्ष्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. यापूर्वी शुभांगीने ‘सावित्रीजोती’ मालिकेत चिमणामाईंची भूमिका साकारली आहे.