अमिताभ बच्चन, अजय देवगण, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि अनेक सुपरस्टार्सनी खाकी वर्दी चढवून चित्रपटात नायकाच्या भूमिका साकारल्या. सिने कलाकारांनाच नाही तर खाकी वर्दीचे आकर्षण सर्वांनाच आहे. पण, सांगलीच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने अभिनय आणि मॉडेलिंगच्या वेडापायी चक्क खाकीला रामराम ठोकलाय. सांगलीचा पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील याने लहानपणापासून जोपासलेले अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस दलाच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली. ३० मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गावठी’ या मराठी चित्रपटाद्वारे मुख्य नायकाच्या भूमिकेतून श्रीकांत पाटील मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे.

श्रीकांतचा हा प्रवास सोपा नव्हता. श्रीकांत पाच वर्षांचा असताना मुंबई क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत असणाऱ्या त्याच्या वडीलांचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले. एक पाच आणि दुसरा तीन वर्षांचा, अशा दोन लहान मुलांची जबाबदारी श्रीकांतच्या आईने मोठ्या धीराने पेलली. शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारा श्रीकांत अभिनयातही चमकू लागला. आपल्याला यातच करिअर करायचे, हे त्याने मनाशी पक्के केले होते. पण, आईच्या खांद्यावरचा भार हलका करण्यासाठी श्रीकांतने कलेचे वेड बाजूला सारून २०१० साली, वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पोलीस दलात शिपाईपदावर रुजू झाला. सहा फूट उंच, गोरा वर्ण, आखीव-रेखीव चेहरा, पिळदार शरीर आणि घारे डोळे असलेला खाकी वेशातला पोलीस पाहून सर्वजण कुतूहलाने श्रीकांतकडे बघत.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

वाचा : सलमानसोबत स्क्रीन शेअर केलेली अभिनेत्री दुर्धर आजाराने ग्रस्त

सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात स्पेशल पोलीस फोर्समध्ये कार्यरत असतानाच त्याने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेची तयारी सुरू केली. तोवर धाकट्या भावालाही नोकरी लागली. पोलीस दलात असतानाही त्याने स्थानिक पातळीवर अभिनयकला जागृत ठेवली. २०१४ यावर्षी श्रीकांत पोलीस उपनिरीक्षकाची परिक्षा उत्तीर्ण झाला. बाल्यावस्थेच वडीलांचे छत्र हरपलेल्या श्रीकांतने वडीलांचे पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. पण, प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या श्रीकांतला चित्रपटविश्व खुणावत होते. त्याने आईला मनातील इच्छा बोलून दाखवली. मुलाच्या मनातील तळमळ जाणून असलेल्या माऊलीने श्रीकांतला त्याच्या आवडीच्या म्हणजेच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी परवानगी दिली. हाती असलेली पोलीसाची सरकारी नोकरी सोडून श्रीकांत मायानगरी मुंबईत दाखल झाला.

 

किशोर नावीद कपूर यांच्याकडे त्याने अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. छंद म्हणून जोपासलेली अभिनय कला आता अधिक भिनत होती. तितक्यात त्याला ‘गावठी’ या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी संधी मिळाली. पहिल्याच ऑडीशनमध्ये श्रीकांतची निवड झाली आणि आज श्रीकांतचे चित्रपटात अभिनय करण्याचे स्वप्न तर साकार झालेच. पण, नायक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून त्याने आईने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवलाय. पोलीस दलातील श्रीकांत अभिनेता आणि चित्रपटाचा नायक झाला हे समजल्यावर केवळ सांगलीकरांनाच नाही तर समस्त महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतोय.