01 October 2020

News Flash

नताशाच्या बाळासोबतच्या फोटोवर सानियाने केली ‘ही’ कमेंट

हार्दिकनेही फोटोवर केला रिप्लाय

भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा जुलै महिन्यात आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर हार्दिकने ३० जुलैला बाळाच्या हातात आपला हात असल्याचा खूप गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली.

गेले काही दिवस हार्दिक आणि नताशा आपल्या बाळासोबत छान वेळ घालवत आहेत. वेगवेगळे फोटो शेअर करत आहेत. नताशाने नुकताच एक फोटो शेअर केला. त्या फोटोमध्ये तिने आपल्या बाळाला उचलून घेतलं होतं. “जेव्हा मी तुझ्यासोबत असते तेव्हा माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो”, असे तिने त्या फोटोला कॅपशन दिलं. तसेच #mamasboy हा हॅशटॅग वापरत आईचा लाडका मुलगा असंही हार्दिक आणि चाहत्यांना सांगितलं. त्या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या. हार्दीकने त्या फोटोवर एक बदामाचा आणि मिठीचा ईमोजी टाकत कमेंट केली. तर टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने दोन लाल रंगाचे बदामाचे ईमोजी वापरून कमेंटमधून प्रेम व्यक्त केलं.

हार्दिकने काही दिवसांपूर्वी एक विशेष फोटो शेअर केला होता. या फोटोत तो नताशासोबत हॉस्पिटल रूममध्ये होता. हार्दिकने नताशा खास गुलांबाचा मोठा बुके (पुष्पगुच्छ) भेट दिला. त्या फोटोसोबत त्याने एक कॅप्शनदेखील लिहिली होती. “माझ्या गुलाबासाठी (नताशा) हे गुलाब. मला आयुष्यातील सर्वात छान गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू”, अशा भावना हार्दिकने त्या फोटोसोबत शब्दातून व्यक्त केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 12:44 pm

Web Title: sania mirza reacts on adorable pic of natasa stankovic baby boy hardik also reacts vjb 91
Next Stories
1 सुशांतच्या बहिणीचा व्हिडीओ अंकिताने केला शेअर; केली CBI चौकशीची मागणी
2 ‘देवा श्री गणेशा’ मालिकेतील गणपती बाप्पाची खास झलक
3 करीनाच्या प्रेग्नंसीवर सोहाची पोस्ट, सैफचा मुलगा इब्राहिमने देखील केली कमेंट
Just Now!
X