News Flash

…म्हणून युवराज सानियाला म्हणाला ‘हाय हाय मिर्ची’

सानिया मिर्झानेही दिलं भन्नाट उत्तर

भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने IPL नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीची घोषणा करताना त्याने देशांतर्गत टी २० स्पर्धेत आणि इतर टी २० लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार सध्या युवराज GT20 Canada या टी २० स्पर्धेत तो खेळला. त्यामुळे तो काही काळ चर्चेत होता. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे.

भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा हिचा १५ नोव्हेंबरला वाढदिवस होता. सानिया मिर्झा ही तिच्या खेळामुळे जितकी चर्चेत असते, तितकीच तिच्या रुपामुळे आणि सौंदर्यामुळेही चर्चेचा विषय ठरते. यंदाच्या तिच्या वाढदिवशी सानियाला तिच्या चाहत्यांनी आणि आप्तेष्टांनी तोंडभरून शुभेच्छा दिल्या. त्यात क्रिकेटपटू युवराज सिंग याच्या शुभेच्छा विशेष भाव खाऊन गेल्या. तिला शुभेच्छा देताना युवराजने ‘हाय हाय मिर्ची’ अशी सुरूवात करत ट्विट केले. तसेच तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

यावर सानियानेही झकास रिप्लाय दिला. युवराजला मोटू असं चिडवत तिने त्याला शुभेच्छांसाठी धन्यवाद दिले.

दरम्यान, भारतीय संघाला पहिला टी २० विश्वचषक जिंकून मंगळवारी १२ वर्षे पूर्ण झाली. त्या स्पर्धेत युवराज सिंगने ६ चेंडूत ६ षटकार मारून दमदार खेळी केली होती. २००७ च्या टी २० विश्वचषकात युवराज सिंगने ५ डावात १४८ धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये युवराजने १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. याच सामन्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉडला ६ षटकार मारले होते. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतही युवराज सिंगने दमदार कामगिरी केली होती. २८ वर्षानंतर भारताने पुन्हा जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेत युवराजने ९ डावात सर्वाधिक ३६२ धावा केल्या होत्या आणि १५ गडीही टिपले होते. या कामगिरीबद्दल त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:31 pm

Web Title: sania mirza yuvraj singh hai hai mirchi tweet reply hilarious funny reaction vjb 91
Next Stories
1 रानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
2 “आमची ४० हजार मंदिरे परत द्या”
3 शिवच्या होत्या तब्बल एवढ्या गर्लफ्रेंड्स, वीणासमोरच केला खुलासा
Just Now!
X