‘भूमी’ या सिनेमाद्वारे संजच दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याचे एव्हाना सर्वांना माहिती झाले आहे. हा सिनेमा वडिल आणि मुलीच्या नात्यावर आधारित असल्याने सिनेमातील त्याची भुमिका ही दमदार असल्याची चर्चा होती. मात्र, सिनेमाचे पहिले टीझर पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाने आणखी उत्सुकता वाढवली आहे. कारण, या पोस्टरमध्ये संजयच्या तोंडातून रक्त टपकताना दिसते आहे. जोराचा ठोसा लागवल्याने ज्या प्रकारे स्थिती होईल अशी त्याची स्थिती यात दिसत आहे.

संजयच्या ‘भूमी’ची कथा ही श्रीदेवीच्या ‘मॉम’ या सिनेमाप्रमाणेच मात्र, वडिलांचा दृष्टीकोन बाळगणारी असेल असे आपल्याला वाटत आहे. अशा चर्चा असल्या तरी याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे या पोस्टरमुळे सिनेमात नक्की काय असेल याची उत्कंठा लागून राहीली आहे. त्यामुळे संजू बाबाला मोठ्या पडद्यावर पाहण्याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

या सिनेमात संजयसोबत आदिती राव हैदरी स्क्रीन शेअर करणार आहे. आदिती यात सिनेमाची नामांकित भूमिका साकारणार आहे. यात तिचे नाव भूमी असून तीने संजूबाबाच्या मुलीची भूमिका साकरली आहे. ‘सरबजीत’ फेम उमंग कुमार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.
आपल्या कमबॅक सिनेमाबद्दल बोलताना संजू बाबा म्हणाला, पहिल्या दिवसापासून अद्यापपर्यंत या सिनेमाच्या कामाचा अनुभव खूपच चांगला आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर खूपच भावनिक झाल्याचे त्याने म्हटले आहे.

‘भूमी’ हा सिनेमा एक भावनिक आणि संवेदनशील बदलापट आहे. येत्या २२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. यानंतर संजय दत्त राजकुमार हिरानीसोबत मुन्नाभाई सिरिजचा शेवटचा सिनेमा करणार आहे.