News Flash

चारित्र्यहिन ‘संजू’वर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाची टीका

पांचजन्य या संघाच्या मुखपत्रात संजू सिनेमाबाबत टीका करण्यात आली आहे, तसेच राजकुमार हिरानी यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

'संजू'

‘संजू’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम सुरु आहे. या सिनेमाने गेल्या तीन आठवड्यात ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र संजू सिनेमावर ताशेरे झाडले आहेत. बाहेरख्याली, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या संजय दत्तच्या आयुष्यावर चरित्रपट बनवून राजकुमार हिरानी यांनी काय साध्य केले असाही प्रश्न संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्रात विचारण्यात आला आहे.

पांचजन्य या संघाच्या मुखपत्रात संजू आणि रईस या दोन्ही सिनेमांवर टीका करण्यात आली आहे. एखाद्या चारित्र्यहीन माणसाच्या किंवा गँगस्टरच्या आयुष्यावर सिनेमा काढून तुम्हाला समाजासमोर कोणता आदर्श ठेवायचा आहे? दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी कोणत्या उद्देशाने संजू सिनेमा तयार केला? संजय दत्तच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्यामागे हिरानी यांचा काय हेतू होता? संजय दत्तच्या आयुष्यातून युवा पिढी काय बोध घेऊ शकते? त्याचा कोणता आदर्श घेण्यासारखा आहे? असे प्रश्न संघाने उपस्थित केले आहेत.

अंडरवर्ल्डवर सिनेमा तयार करण्यात आला तरीही पांचजन्य मधून प्रश्न विचारले जातात आणि त्यावर टीकाही होते. बॉलिवूडने माफिया, अंडरवर्ल्डवर सिनेमांची निर्मिती करू नये असेही संघाने म्हटले आहे. तसेच संजय दत्तबाबतही या मुखपत्रात कडाडून टीका करण्यात आली आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटादरम्यान कट्टरतावाद्यांना साथ दिली होती. अशा संजय दत्तवर सिनेमा का बनवला असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

संजू सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर त्यांच्या पीके या सिनेमावरूनही टीका झाली होती. पीके सिनेमात हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप हिंदुत्त्ववादी संघटनांनी केला. पांचजन्यनेही पीके सिनेमावर टीका केली होती. या सिनेमातून छुप्या पद्धतीने हिंदू धर्म, तसेच त्यातील प्रथा यांची खिल्ली उडवली होती असेही संघाने म्हटले होते. आता संजू सिनेमावरून हिरानी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला राजकुमार हिरानी उत्तर देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 3:34 pm

Web Title: sanjay dutt a drug addict womaniser criminal says rss mouthpiece
Next Stories
1 लग्नाचा खर्च जाहीर करण्याची सक्ती करा – सर्वोच्च न्यायालय
2 हिंदू पाकिस्तानच्या वादाबाबत शशी थरूर म्हणतात ‘कुछ तो लोग कहेंगे!’
3 चोरी केल्याचा पश्चात्ताप, दागिने परत करत मागितली माफी
Just Now!
X