बॉलिवूडमधला सर्वात वादग्रस्त अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद लाभताना दिसत आहे. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम मोडले. या चित्रपटानं तीनशे कोटींचा टप्पा पार करत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली. मात्र आता सलमान खानच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी १३ कोटींची गरज या चित्रपटाला आहे.

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला ‘टायगर झिंदा है’ या सलमानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ३३९. १६ कोटींची कमाई केली होती. ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित होऊन २३ दिवस उलटले आहे. तरीही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत ३२६.९८ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘संजू’ ‘टायगरचा’ रेकॉर्ड मोडण्यास यशस्वी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘दंगल’, ‘पिके’, ‘टायगर झिंदा है’ नंतर सर्वाधिक कमाई करणारा हा चौथा चित्रपट आहे.

bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा
south superstar prithviraj sukumaran fasted for 3 days and drank vodka for nude scene
न्यूड सीन देण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टारने ठेवला तीन दिवसांचा उपवास अन् मग प्यायला 30ml वोडका, ‘अशी’ झाली होती अवस्था

‘संजू’नं सलमानच्या ‘रेस’ आणि ‘पद्मावत’लाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. ‘संजू’ भारतामध्ये ४ हजार १०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर संजयच्या भूमिकेमध्ये झळकला. ‘संजू’ आशियाई देशांमध्ये प्रदर्शित व्हावा यासाठी फॉक्स स्टार स्टुडिओ प्रयत्न करत आहे. प्रथम हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होईल. चीनमधील अनेक वितरकांशी याबद्दल चर्चा सुरू आहेत. गेल्या वर्षभरात चिनी प्रेक्षकांकडून भारतीय चित्रपटांना चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे जर हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला तर येथील प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.