News Flash

बॉलिवूडच्या ‘मुन्ना भाई’ने घेतली नितीन गडकरींची भेट; पायांना स्पर्श करून घेतले आशिर्वाद

या भेटीनंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. दोघांच्या भेटी दरम्यानचे विषय अद्याप समोर आलेले नाहीत.

(Photo: Instagram@gadkari.nitin)

बॉलिवूडचा ‘मुन्ना भाई’ संजय दत्तनं नुकतीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अभिनेता संजय दत्तने गेल्या शनिवारीच ही भेट घेतली आहे. मात्र या भेटीचे फोटोज आज समोर आले आहेत. अभिनेता संजय दत्तने नितिन गडकरींची ही भेट नक्की कोणत्या कारणांसाठी घेतली होती आणि या भेटी दरम्यान नक्की काय चर्चा झाली, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

अभिनेता संजय दत्त गेल्या शनिवारी नागपूरमध्ये होता. तो वर्धा रोड इथे असलेल्या नितिन गडकरींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचला. त्यांना भेटल्यानंतर बॉलिवूडचा ‘मुन्ना भाई’ संजय दत्तने नितिन गडकरींच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशिर्वाद देखील घेतले. मात्र, संजय दत्तच्या या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. पण संजय दत्तच्या या दौऱ्यामुळे त्याचे भेटी सत्र हे त्याच्या राजकारणात येण्यासाठी ही तयारी आहे का, अशा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nitin Gadkari (@gadkari.nitin)

केंद्रीय मंत्री नितिन गडकरीं व्यतिरिक्त संजय दत्तने महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांच्या सुद्धा घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्याने नितिन राऊत यांचा मुलगा आणि सुनेची देखील भेट घेतली. नितिन राऊत यांच्या मुलाचा विवाह गेल्या फेब्रूवारीमध्ये पार पडला होता. पण त्यावेळी करोना परिस्थितीमुळे रिसेप्शन रद्द करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा नितिन राऊत यांच्या या निर्णयाचं कौतुक केलं होतं.

अभिनेता संजय दत्त गेल्या शनिवारी एका खाजगी कारणासाठी नागपूरमध्ये गेला होता. नितिन गडकरी आणि नितिन राऊत यांची भेट घेऊन तो त्याच रात्री मुंबईत परतला, अशी माहिती कॉंग्रेस प्रवक्ते संजय दुबे यांनी दिली. संजय दुबे यांचा मुलगा आणि संजय दत्त या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. त्यावेळी अभिनेता संजय दत्तने जाहीरपणे सांगितलं होतं की, त्याला राजकारणात येण्याबाबत कोणतीही इच्छा नाही.

यापूर्वी सुद्धा २०१९ मध्ये संजय दत्तने अशाच प्रकारने केंद्रीय मंत्री नितिन गडकरींची भेट घेतली होती. मात्र ही भेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पुर्वी झाली होती. त्यावेळी सुद्धा संजय दत्त राजकारणात येण्याबाबत वेगवेगळ्या चर्चांना वाऱ्यासारख्या पसरू लागल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 9:52 pm

Web Title: sanjay dutt courtesy visit to nitin gadkari in nagpur prp 93
Next Stories
1 शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन केली दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची चौकशी
2 “करोनाला रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते”, हेमा मालिनी यांचा धक्कादायक खुलासा
3 आता ‘द फॅमिली मॅन ३’; मनोज वाजपेयी लढणार चीनशी?
Just Now!
X