News Flash

Photo : प्रियकराच्या आठवणीत संजय दत्तची मुलगी भावूक

'तो माझ्यावर तितकंच प्रेम करायचा'

संजय दत्त, त्रिशाला दत्त

 

अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त गेल्या काही दिवसांपासून इटालियन बॉयफ्रेंडसह रिलेशनशीपमध्ये होती. २ जुलै रोजी तिच्या बॉयफ्रेंडचा अकस्मात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्रिशाला धक्काच बसला आहे. त्या दुखा:त त्रिशालाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची मुलगी त्रिशाला दत्त हिच्या प्रियकराचे काही दिवसापूर्वी अकस्मात निधन झाले. त्याच्या निधनाची माहिती खुद्द त्रिशालाने सोशल मीडियावर दिली होती. मात्र प्रियकराच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्रिशालाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून ती सावरण्याचा प्रयत्न करत असून बराचशा प्रमाणात आता ती स्थिर झाली आहे. प्रियकराच्या निधनानंतर जवळपास महिन्याभरानंतर त्रिशालाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहीली आहे.

त्रिशाला प्रियकराच्या निधनाचं दु:ख विसरुन आयुष्यात पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काही दिवसापूर्वी तिने एका लग्नसमारंभात हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्यातील एक फोटो त्रिशालाने शेअर केला आहे. ‘या आठवड्याच्या शेवटी स्वत:ला सावरत, तयार होऊन आणि चेहऱ्यावर हसू आणत माझ्या जवळच्या एका मित्राच्या लग्नाला पोहोचले आहे. माझा बेस्टफ्रेंड आणि नववधू दोघेही सुंदर दिसत आहेत’, असं त्रिशाला म्हणाली.


पुढे ती म्हणते, गेले काही दिवस माझ्यासाठी प्रचंड कठीण होते,मी स्वत:ला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. मी त्याला खूप मिस करते. मी त्याच्यावर प्रचंड प्रेम करत होते, तोदेखील माझ्यावर तितकच प्रेम करायचा.

दरम्यान, त्रिशालाच्या प्रियकराचं २ जुलै रोजी अकस्मात मृत्यू झाला. प्रियकराच्या निधनाची माहिती त्रिशालाने स्वत: सोशल मीडियावर दिली होती. त्रिशाला संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची ऋचा शर्माची मुलगी आहे. त्रिशाला ८ वर्षांची असतांना ऋचाचं निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर त्रिशाला तिच्या मावशीकडे राहत होती. तिने न्युयॉर्कमधील जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिस येथे शिक्षण घेतलं असून न्यूयॉर्क मधील हॉफ्स्ट्रा यूनिवर्सिटीमधून मास्टर्स डिग्री घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 9:06 am

Web Title: sanjay dutt daughter trishala dutt attends best friend sister marriage after boyfriend death wrote latter ssj 93
Next Stories
1 ‘अवतार’ची ऑफर नाकारल्यामुळे गोविंदा झाला ट्रोल, मीम्स व्हायरल
2 एन.एस.एस.च्या कॅम्पला आजही आवर्जून जाते
3 ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ नृत्य स्पर्धेत वसई, भाईंदरचे कलाकार उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X