News Flash

अखेर सलमान-संजय दत्तमधला दुरावा मिटला?

संजय दत्तच्या दिवाळी पार्टीमध्ये अनेक कलाकारांची मांदियाळी

बुधवारी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत बॉलिवूडमधल्या अनेक तारे तारका उपस्थित होत्या.

दिवाळीनिमित्त सलमान खान, शहारुख खान, एकता कपूर, आलिया भट्ट यांनी आपल्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. संजय दत्तनेदेखील आपल्या राहत्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीला बॉलीवूडमधल्या अनेक तारेतारकांनी उपस्थिती लावली होती, पण एका वेगळ्याच कारणाने संजय दत्तची दिवाळी पार्टी चर्चेचा विषय ठरली. गेल्या काही दिवसांपासून संजय दत्त आणि सलमान खान यांच्या मैत्रित कटुता आली अशाप्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण संजय दत्तच्या दिवाळी पार्टीत उपस्थिती लावून सलमानने साऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

१९९३च्या साखळी बॉम्बस्फोटावेळी अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगून संजय बाहेर आल्यानंतर बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींनी त्याची भेट घेतली होती पण सलमान मात्र कुठेच दिसला नाही, त्यामुळे साहजिकच या दोघांच्या मैत्रिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण भाई जान सलमाने जॅकलिनसोबत उपस्थिती लावून संजयसोबत आपली मैत्री अजूनही टिकून आहे हे पुन्हा दाखवून दिलं.

बुधवारी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत बॉलिवूडमधल्या अनेक तारे तारका उपस्थित होत्या. विद्या बालनदेखील पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत आली होती. ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटात संजय आणि विद्याने एकत्र काम केलं होतं, आज मी माझ्या सर्वात आवडत्या कलाकाराला भेटली असं लिहित संजय दत्तच्या पार्टीतला फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. आमिर खानने देखील पार्टीला उपस्थिती लावली पण यावेळी मात्र तो एकटाच पार्टीत दिसला. याशिवाय शिल्पा शेट्टी, अनिल कपूर, सोनाली बेंद्रे, ऋषि कपूर अशा अनेक कलाकारांची मांदियाळी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 3:29 pm

Web Title: sanjay dutt diwali party salman khan attend grand celebration
Next Stories
1 निर्मात्याने तिला नग्न अवस्थेत उभे राहण्यास सांगितले
2 आमिरशी घेतला पंगा; केआरकेचं ट्विटर अकाऊंट बंद
3 समाजकंटकांच्या ‘त्या’ कृतीवर भडकली दीपिका
Just Now!
X