28 February 2020

News Flash

संजू’बाबा’चं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

'माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या बाबांना हा चित्रपट समर्पित,' असं ट्विट संजय दत्तने केलं आहे. 

संजय दत्त

अभिनेता संजय दत्त लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तो मराठी चित्रपटात अभिनय नव्हे तर चित्रपटाची निर्मिती करत आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बाबा’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याने हा चित्रपट वडील सुनील दत्त यांना समर्पित केला आहे. संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बाबा’ हा चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या बाबांना हा चित्रपट समर्पित,’ असं ट्विट संजूबाबाने केलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर. गुप्ता यांनी केले असून संजयने चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत सायकलवर बसलेला दिसून येत आहे. भावनेला भाषा नसते अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. यात कोणकोणते कलाकार भूमिका साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

संजय दत्तच्या ‘बाबा’ चित्रपटाची कथा नेमकी काय असणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण पिता-पुत्राच्या नात्यावर हे चित्रपट भाष्य करणार हे शीर्षकावरूनच स्पष्ट होत आहे.  याआधी अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यांनी देखील मराठी चित्रपटाची निर्मिती केली.

First Published on June 18, 2019 3:43 pm

Web Title: sanjay dutt first marathi film baba dedicated to his father ssv 92
Next Stories
1 रणवीर सिंगनं शेअर केली कोहली, सचिनसोबतची क्षणचित्रं
2 ‘सेक्रेड गेम्स २’साठी चाहत्यांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा?
3 फिट राहण्यासाठी ‘या’ पाच अभिनेत्रींचं योगसाधनेला प्राधान्य
Just Now!
X