News Flash

‘या’ कारणामुळे मान्यताने नाकारलं संजयने दिलेलं १०० कोटींचं गिफ्ट

...म्हणून संजय दत्तने दिलेलं गिफ्ट मान्यताने नाकारलं

२०२१ हे नवीन वर्ष कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींसाठी खास ठरलं आहे. या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. तर, काही सेलिब्रिटींनी नवीन घरात गृहप्रवेश केला. यामध्येच अभिनेता संजय दत्तने त्याच्या पत्नीला चार फ्लॅट गिफ्ट म्हणून दिले होते. मात्र, मान्यताने हे १०० कोटींचे फ्लॅट त्याला परत केल्याचं ‘मनी कंट्रोल’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

डिसेंबर महिन्यात संजय दत्तने मान्यताला वांद्रे येथे जवळपास १०० कोटींचे चार फ्लॅट गिफ्ट म्हणून दिले होते. हे चारही फ्लॅट पाली हिल येथील इम्पीरियल हाइट्स या इमारतीत आहे. मात्र, हे चारही फ्लॅट मान्यताने एका आठवड्यातच त्याला परत केले.

वाचा : …म्हणून लग्नानंतर नताशा दलाल झाली ट्रोल

संजयने गिफ्ट केलेल्या या चारही मालमत्तांसाठी २६.५ कोटी रुपये हे सरकारने ठरविलेलं मूल्य आहे. परंतु, युनिटचे बाजार मूल्य हे १०० कोटींपेक्षा जास्त असल्याचं ब्रोकर्सचं म्हणणं आहे.  संजय दत्तने मागील वर्षी २३ डिसेंबर रोजी मान्यताला हे गिफ्ट दिलं होतं. परंतु, तिने काही दिवसातच हे गिफ्ट परत केलं. विशेष म्हणजे कर वाचवण्यासाठी मान्यताने हे केल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : ‘आम्ही दोन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो पण..’; सिद्धार्थने सांगितली लग्नापूर्वीची गोष्ट

या चार फ्लॅटपैकी दोन अपार्टमेंट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आहेत. तर, ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर एक पेन्टहाऊस आहे. झॅपकी डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध मालमत्ता नोंदणी डेटा एकत्रित आणि संयोजित केला जातो. त्यानुसार, यावर संजयने गिफ्ट केलेल्या अपार्टमेंटची माहितीदेखील दाखवण्यात आली आहे. याविषयी त्यांच्याकडे यासंबंधीची नोंदणीकृत कागदपत्रे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 12:03 pm

Web Title: sanjay dutt gifted 100 crore property flat to manyata she returned gift in just 6 days ss 93
Next Stories
1 “मुलांना थंड हवेच्या ठिकाणी जरूर न्या, पण…”, प्रवीण तरडेंचा पालकांना सल्ला
2 मलायकाने शेअर केला बोल्ड फोटो, सोहेल खानच्या पत्नीने केली कमेंट
3 …म्हणून लग्नानंतर नताशा दलाल झाली ट्रोल
Just Now!
X