27 January 2021

News Flash

दिवाळी पार्टीत संजय दत्तने छायाचित्रकारांना केली शिवीगाळ

संजूबाबाच्या अशा वर्तणुकीवर अनेकांनी संताप व्यक्त केला असून सोशल मीडियावर त्याच्यावर टीकासुद्धा होऊ लागली आहे.

संजय दत्त

दिवाळीनिमित्त काही बॉलिवूड सेलिब्रिटींकडून जंगी पार्टीचं आयोजन करण्यात येतं. अभिनेता संजय दत्तनेही त्याच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या पार्टीला बॉलिवूडमधील बरेच कलाकार उपस्थित होते. पण या पार्टीनंतर संजूबाबाने त्याच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संजूबाबाची दिवाळी पार्टी टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती. पार्टी संपल्यानंतर संजय पत्नी मान्यता आणि मुलांसह फोटोग्राफर्सना पोज देण्यासाठी बाहेर आला. छायाचित्रकारांना कुटुंबीयांसोबत फोटो काढू दिल्यानंतर संजय दत्त आत गेला. त्याच्या मागोमाग एकानंतर एक सेलिब्रिटी घराबाहेर पडू लागले आणि छायाचित्रकारांनी त्यांना टिपण्यासाठी गर्दी केली. तेव्हा चिडलेल्या संजूबाबाने घराबाहेर येत थेट त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

वाचा : #MeToo: माजी मिस इंडिया निहारिका सिंगचे नवाजुद्दीनवर आरोप

तुमच्या घरी दिवाळी नाही का, असंही त्याने छायाचित्रकारांना सुनावलं. संजूबाबाच्या अशा वर्तणुकीवर अनेकांनी संताप व्यक्त केला असून सोशल मीडियावर त्याच्यावर टीकासुद्धा होऊ लागली आहे. संजय दत्त पत्रकारांना, छायाचित्रकारांना शिवीगाळ करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०१६ मध्ये वाढदिवसाच्या पार्टीनंतरही संजयने छायाचित्रकारांना शिवीगाळ केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 3:17 pm

Web Title: sanjay dutt lashes out at photographers after diwali party
Next Stories
1 #MeToo: माजी मिस इंडिया निहारिका सिंगचे नवाजुद्दीनवर आरोप
2 ‘चला हवा येऊ द्या’मधील त्या पात्रावर आगरी समाजाचा आक्षेप
3 शाहरुखच्या ‘झीरो’ चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिका
Just Now!
X