23 February 2020

News Flash

शब्दांपलीकडलं अबोल नातं सांगणारा संजय दत्तचा ‘बाबा’; पाहा ट्रेलर

'बाबा' या चित्रपटातून संजय दत्त मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

‘बाबा’ या चित्रपटातून संजय दत्त मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो अभिनय नव्हे तर निर्मिती करत आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून त्याने या चित्रपटाची घोषणा केली होती. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटात दीपक डोब्रियाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, बालकलाकार आर्यन मेघाजी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शंकर या लहान मुलाची भावनिक कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये शंकरच्या पालकत्वासाठी सुरू असलेला लढा पाहायला मिळतोय. खेडेगावातल्या एका गरीब कुटुंबात शंकर राहत असतो. आई-वडीलांना बोलता येत नाही पण छोट्याशा कुटुंबात ते खूश असतात. अचानक एके दिवशी शहरातील दाम्पत्य शंकरला आपला मुलगा असल्याचं म्हणत त्याला घेऊन जाण्यासाठी येतात. इथून पुढे शंकरच्या आईवडिलांचा लढा सुरू होतो. मुलासाठी एका बाबाने केलेल्या संघर्षाचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर. गुप्ता यांनी केले आहे. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on July 16, 2019 4:38 pm

Web Title: sanjay dutt producing first marathi film baba trailer released ssv 92
Next Stories
1 कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने मागितली ही गोष्ट
2 गुरुपौर्णिमेनिमित्त हृतिक पोहोचला बिहारला, घेतली आनंद कुमार यांची भेट
3 सनीने अमेरिकेत घेतला ‘स्वप्नांचा बंगला’
Just Now!
X