News Flash

संजय दत्त करणार मराठी सिनेमाची निर्मिती

या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही असेही संजय दत्तनेही स्पष्ट केले

अभिनेता संजय दत्त मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. याबाबत ट्विटरवर ट्विट करत संजय दत्तने माहिती दिली आहे. संजय दत्तने या मराठी सिनेमातील एक फोटोही ट्विट केला आहे. या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या सिनेमात दीपक डोब्रियाल, नंदीता धुरी, अभिजित खांडकेकर, स्पृहा जोशी यांच्या या सिनेमात भूमिका आहेत. अभिषेक बच्चन, प्रियंका चोप्रा यांच्या पाठोपाठ आता मराठी सिनेमाच्या निर्मितीत संजय दत्तनेही पुढाकार घेतला आहे. या सिनेमाचे शुटिंग सुरु आहे असेही कळते आहे. आता हा सिनेमा कोणता असणार आणि कसा असणार आणि त्याचे नाव काय असणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. संजय दत्त प्रॉडक्शन्स तर्फे या सिनेमाची निर्मिती केली जाते आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राजू गुप्ता करतो आहे अशीही माहिती समोर आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 12:42 am

Web Title: sanjay dutt productions 1st venture in marathi film yet untitled
Next Stories
1 सिद्धार्थ-रितेशच्या ‘मर जावा’चं पोस्टर प्रदर्शित
2 २८ वर्षानंतर कपूर कुटुंबातील ‘या’ अभिनेत्याचं पुनरागमन
3 Video : बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्या ‘कृतांत’चा टीझर प्रदर्शित
Just Now!
X