News Flash

नर्गिस दत्त यांच्या वाढदिवशी संजय दत्तने शेअर केली इमोशनल पोस्ट; मुलगी त्रिशालाने दिली ही प्रतिक्रिया

म्हणाला, 'आप जैसे कोई नहीं है मां'

(Photo: Instagram@ duttsanjay)

बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा आज वाढदिवस…त्यांच्या वाढदिवशी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळालाय. त्यांच्या जुन्या आठवणी पाहून अनेक फॅन्सचे डोळे सुद्धा पाणावले होते. नर्गिस दत्त यांच्या वाढदिवशी बॉलिवूडचा ‘मुन्ना भाई’ संजय दत्तने देखील त्यांची आठवण काढली. त्यांच्या आठवणीत त्याने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

आई नर्गिस दत्त यांच्या आठवणीत संजय दत्तने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही इमोशनल पोस्ट लिहिली आहे. सोबत त्याने एक अनसीन फॅमिली फोटो शेअर केलाय. या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ फोटोमध्ये संजय दत्तचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये दिसून येत आहे. यात संजय दत्त याच्यासोबत त्याच्या दोन बहिणी, वडिल सुनिल दत्त आणि आई नर्गिस दत्त दिसून येत आहेत. या फोटोमध्ये नर्गिस त्यांचे पती आणि मुलांसोबत चेहऱ्यावर हास्य फुलवत पोज देताना दिसून येत आहेत. सगळं कुटुंबच एकत्र या फोटोमध्ये खूप आनंदी दिसून येत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. तर नर्गिस यांचे फॅन्स या फोटोंवर कमेंट करत त्यांची आठवण काढताना दिसून आले. हा फोटो शेअर करताना संजय दत्तने एक कॅप्शन लिहिली आहे. यात त्याने लिहिलं, “तुझ्यासारखं कुणीच नाही आई…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

मुलगी त्रिशालाने दिली ही प्रतिक्रिया
संजय दत्तने शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट करत त्याची मुलगी त्रिशालाने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने रेड हार्टचे इमोजी मोठ्या प्रमाणात वापरले आहेत.

नर्गिस यांची कॅन्सर विरोधातली झुंज अपयशी ठरली
नर्गिस यांचं ३ मे १९८१ रोजी कॅन्सरमुळे निधन झालं. नर्गिस यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीच मुलगा संजय दत्तचा पहिला चित्रपट ‘रॉकी’ रिलीज झाला होता. दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांना १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडीया’ चित्रपटातल्या राधाच्या भूमिकेसाठी नावाजलं जातं. याशिवाय ‘रात और दिन’, ‘जोगन’ आणि ‘बाबुल’ सारख्या अनेक चित्रपटांमधल्या भूमिका आजही विसरता आले नाहीत.

या चित्रपटासाठी चर्चेत आहे संजय दत्त
संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो ‘शमशेरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो ‘केजीएफ चॅप्टर 2’ मधून सुद्धा झळकणार आहे. हा चित्रपट यावर्षीच्या शेवटी रिलीज करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 8:04 pm

Web Title: sanjay dutt remembers mother nargis dutt on her birthday says nobody else like you prp 93
Next Stories
1 ‘या’ अभिनेत्रीशी लग्न करण्यासाठी गोविंदाने मोडला होता साखरपुडा
2 ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नाला बायजींचा पुढाकार
3 जॉनी लिव्हरची लेक गेल्या आठ वर्षांपासून करते करिअरमध्ये संघर्ष, केला मुलाखतीमध्ये खुलासा
Just Now!
X